TET exam Scam : पुणे पोलिसांचा धडाका सुरुच, आश्विन कुमारच्या घरातून 2 किलो सोनं, 24 किलो चांदी जप्त
पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून (Pune Cyber Police) टीईटी परीक्षा (TET Exam Scam) प्रकरणी कारवाई सुरुचं आहे. पुणे पोलिसांनी बंगळुरुमधून आश्विन कुमारच्या घरातून 24 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत.
पुणे: पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून (Pune Cyber Police) टीईटी परीक्षा (TET Exam Scam) प्रकरणी कारवाई सुरुचं आहे. पुणे पोलिसांनी बंगळुरुमधून आश्विन कुमारच्या घरातून 24 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विन कुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख असल्याची माहिती आहे.
1 कोटींपेक्षा अधिक रकमेचा ऐवज जप्त
पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अश्विन कुमारच्या घरातून 14 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विन कुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख आहे.
आश्विन कुमारला बंगळुरुतन अटक
जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला 20 ते 21 डिसेंबरला बंगळूरमधून अटक करण्यात आली होती. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय.या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता.
तुकाराम सुपेच्या मित्राकडून 5 लाख जप्त
पुणे पोलिसांच्या वतीनं तुकाराम सुपेकडून रोकड हस्तगत करण्याचे काम सुरूच आहे. सुपेचे आणखी 5 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तुकाराम सुपेच्या मित्राकडून 5 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. 24 तासात सुपेचे 63 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सुपेचे एकूण ३ कोटी ९३ लाखांचे घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे. तुकाराम सुपेकडून आणखी रक्कम हस्तगत होण्याची शक्यता आहे.
लखनऊमधून सौरभ तिवारीला अटक
पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊ मधून एकाला अटक करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पुणे सायबर पोलीस सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणणार आहेत. पुण्यात आणून पुणे पोलीस सौरभ त्रिपाठीची चौकशी करण्यात येणार आहे. सौरभ त्रिपाठी हा जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ त्रिपाठी हा विनर कंपनी चालवत असल्याची माहिती आहे.
इतर बातम्या:
TET Scam | टीईटी घोटाळ्यात GA कंपनीचा संचालक सौरभ तिवारीला अटक
Tet exam scam Pune Police seized 2 kg gold and 24 kg silver from house of Aswin kumar relation with GA Technologies