Tukaram Supe : तुकाराम सुपे याच्याकडं आणखी घबाड सापडलं, 24 तासात 58 लाख रुपये जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याच्या कार्यालयातून गेल्या चोविस तासात 50 लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

Tukaram Supe : तुकाराम सुपे याच्याकडं आणखी घबाड सापडलं, 24 तासात 58 लाख रुपये जप्त, पुणे पोलिसांची कारवाई
तुकाराम सुपे
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 1:15 PM

पुणे : पुणे पोलिसांनी(Pune Police) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याच्या कार्यालयातून गेल्या चोवीस तासात 50 लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी दिली आहे. टीईटी परीक्षा गैरव्यवहार (TET Exam Scam) प्रकरणी पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या परिचिताकडून काल रात्री 25 लाख रुपये जप्त केले होते. त्यानंतर आणखी एकदा त्याच्या कार्यालयावर छापा टाकत पुणे पोलिसांनी 33 लाख रुपये जप्त केले आहेत. पुणे पोलिसांना 24 तासात तुकाराम सुपेकडून 58 लाख रुपये जप्त करण्यात यश आलं आहे. यापूर्वी एक कोटी 58 लाख आणि 90 लाख सुपेकडून आणि त्याच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आले होते. तुकाराम सुपेकडून आतापर्यंत 3 कोटी 87 लाख रुपये आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तुकाराम सुपेची लेक आणि जावयाकडून 1 कोटी 58 लाख जप्त

पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेची आणखी चौकशी केली असता त्याला पैसे लपवण्यात त्याची मुलगी कोमल पाटील आणि जावई नितीन पाटील यांनी मदत केल्याचं समोर आलं होतं. पुणे पोलिसांनी यानंतर त्या दोघांना चौकशीला बोलावलं. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चौकशी करुन छापा टाकून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि 70 लाखांचं सोनं हस्तगत केलं होतं.

पहिल्या छाप्यात 90 लाखांचा ऐवज जप्त

पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेला अटक केल्यानंतर त्याच्या घरी पहिला छापा टाकला होता. त्यावेळी सुपेच्या घरातून 88 लाख 49 हजार 980 रोख, पाच ग्रॅम सोन्याचे नाणे, 5 लाख 50000 हजार रुपयांची एफ डी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय सुपेने त्याच्या मित्राला लाखो रुपये दिल्याचेही माहिती मिळाली आहे, असं पुणे पोलिसांनी सांगितलं होतं.

टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी  जी.ए सॉफ्टवेअर कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरा हिंजवडीतून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोघांची सायबर शाखेत चौकशी सुरु आहे.

2018 च्या परीक्षेतही घोळ

पुणे पोलीस  आयुक्त अमिताभ गुप्ता   यांनी पत्रकार परिषद घेत टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराबद्दल माहिती दिली होती. 2018 च्या टीईटी परीक्षेतही  घोटाळा झाला होता, अशी माहिती गुप्ता यांनी दिली आहे. 2018 मध्ये टीईटी परीक्षेतही घोळ झाला होता.

इतर बातम्या : 

TET Scam | टीईटी घोटाळ्यात GA कंपनीचा संचालक सौरभ तिवारीला अटक

TET Exam Scam : 2018 च्या टीईटी परीक्षेतही घोळ, 500 जणांच्या निकालाशी छेडछाड, 5 कोटींचा आर्थिक व्यवहार : अमिताभ गुप्ता

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.