दरोड्याच्या तयारीत असलेल्या 6 जणांच्या टोळीला भोसरी पोलिसांनी इंगा दाखवला, तिथल्या तिथं नांग्या ठेचल्या!
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळक्याला भोसरी पोलिसांनी तिथल्या तिथे जेरबंद केलंय. सिंतागण गार्डन, कासारवाडीमध्ये ही कारवाई करण्यात आलीय. कोयते, ब्लेड, लाकडी दांडके, स्क्रु ड्रायव्हर, हातोडी, मिरची पूड यासारखे मनाई असलेले साहित्य जवळ बाळगून आरोपी दरोड्याच्या तयारीत होते.
पिंपरी चिंचवड : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळक्याला भोसरी पोलिसांनी तिथल्या तिथे जेरबंद केलंय. सिंतागण गार्डन, कासारवाडीमध्ये ही कारवाई करण्यात आलीय. कोयते, ब्लेड, लाकडी दांडके, स्क्रु ड्रायव्हर, हातोडी, मिरची पूड यासारखे मनाई असलेले साहित्य जवळ बाळगून आरोपी दरोड्याच्या तयारीत होते.
सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड मधील कासरवाडी भागात रात्रीच्या सुमारास लुटमार आणि दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना पिंपरी चिंचवड भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लोखंडी कोयते, लाकडी दांडके, एक स्क्रू ड्रायव्हर, एक लोखंडी हातोडी, मिरचीपूड व 90 हजार रुपये किमतीची एक रिक्षा त्यांच्याजवळ मिळून आली.
पोलिसी खाकया दाखवला, आरोपी पोपटासारखे बोलू लागले
आरोपींची चौकशी करत असताना ते पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं देत नव्हते. पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर आरोपी पोपटासारखे बोलू लागले. लूटमार करून दरोडा टाकण्याच्या तयारीत होतो, असा खुलासा आरोपींकडून करण्यात आला.
भोसरी स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दगड अथवा शस्त्रास्त्रे, तलवारी, भाले, लाठी, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर बाळगणे याला मनाई असताना सदर आरोपींनी या आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात कलम 399,402 व आर्म ऍक्ट नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांचं स्ट्राँग नेटवर्क
पोलिसांचं नेटवर्क एवढं स्ट्राँग होतं की आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी टोळक्याला तिथल्या तिथल्या ताब्यात घेतलं. तसंच पोलिसी खाक्या दाखवून त्यांचा प्लॅनही त्यांच्याकडूनच वदवून घेतला.
(The gang preparing For the Robbery was Arrested By bhosari police)
हे ही वाचा :
डायरीने उलगडले वलसाडमधील तरुणीच्या आत्महत्येचे रहस्य; ट्रेनमध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण