Pune crime | कोयता घेऊन दहशत परसवणाऱ्या कथित ‘भाई’ च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

आरोपीचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये शेअरचॅट या सोशल मीडिया ऍपवरून डाऊनलोड केलेला पिस्तूलचा व्हिडिओ त्याने व्हाटसअप स्टेटसला ठेवला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी हा पोलीस रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे.

Pune crime | कोयता घेऊन दहशत परसवणाऱ्या कथित 'भाई' च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 9:43 AM

पिंपरी-  शहरातील भूमकर चौकातील डेअरी फार्म समोर उघडपणे कोयता नाचवत दहशत पसरवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कृष्णा तुळशीराम राऊत (वय २२, वाकड, मूळ उस्मानाबाद), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी अतिक शेख यांनी याबाबत वाकड पोलीस स्थानकात फिर्याद दिली.

अशी केली अटक

अटक करण्यात आलेला आरोपी कृष्णा राऊत हा भूमकर चौक ते डांगे चौक रोड येथे हातात कोयता घेऊन मोठ्याने ओरडत दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर जात आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील कोयता जप्त केला. आरोपीचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये शेअरचॅट या सोशल मीडिया ऍपवरून डाऊनलोड केलेला पिस्तूलचा व्हिडिओ त्याने व्हाटसअप स्टेटसला ठेवला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी हा पोलीस रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, उपनिरीक्षक गणेश तोरगल, पोलीस कर्मचारी बिभिषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, बापूसाहेब धुमाळ, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, दीपक साबळे, अतिष जाधव, बाबा चव्हाण, अतिक शेख, प्रमोद कदम, कौंतेय खराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

गावगुंडांचा हौदस ठरतोय डोके दुखी

शहरात गुंडांवर पोलीस प्रशासनाचा वचक नसल्याचे सातत्याने समोर येत आहे. शहरातल्या विविध परिसरात वाढत असलेली गाव गुंडांची पिल्लावळ कायमचा  शास्त्राचा धाक दाखवत, तर कधी वादावादी- शिवीगाळ करत दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या गावगुंडांचा नाहक त्रास परिसरातील स्थानिक, सर्वसामान्य लोक, व्यवसायिक यांना सहन करावा लागत आहे. प्रशासनाने वेळीच या गुंडांना आवरा घालण्याची गरज निर्माण झाल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

पौष महिन्यातील रविवारी या प्रकारे करा सूर्यदेवाची पूजा, धन-समृद्धीची कमतरता होणार नाही!

नाशिकमध्ये प्रशासनाला डुलकी; जमावबंदीतला ‘ज’ सुद्धा पाहायला मिळेना, कोरोना नियमांच्या अमंलबजावणीचा विसर

पोलीस भरती परीक्षेत ‘मुन्नाभाई’ स्टाईल कॉपीला मदत, औरंगाबादेतील पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.