पुणे – शहरात वाढत्या गुन्हेगारीबरोबरच आत्महत्येचे सत्रही वाढत आहे.काल (रविवारी) तरुणाने कर्जबाजारीपणामुळं आईची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज धनकवडी येथे नैराश्यातून तरुणाने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शंकर बसवराज कलशेट्टी (वय 23 ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या जवानाने तलावातून शंकरचा मृतदेह बाहेर काढत श्वविच्छेदानासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
अशी घडली घटना
शहरातील धनकवडी परिसरात मृत शंकर बसवराज कलशेट्टी आपल्या कुटुंबियांसोबत राहता होता. घटनेच्या रात्री उशीराने शंकरने कुटुंबियांना मोबाईलवरून मी आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला होता. मेसेज बघताच घरातल्यांनी तात्काळ भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात धाव घेत घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या सोबत त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर भिलारेवाडी तलावाजवळ चप्पल आढळून आल्याने पोलिसांनी कात्रज अग्निशामन केंद्राला कळविले. कात्रज अग्निशामक केंद्रातील जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळातच तरुणाचा मृत्यूदेह बाहेर काढला. शंकर ने आत्महत्या करण्यापूर्वी ब्लेडने हाताची नस कापली होती.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
आत्महत्येपूर्वी शंकरने चिठ्ठी लिहित आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती यांची माफी मागितली आहे. मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला आहे. माझ्या जीवनात काही समस्या आहेत, आणि त्या मी सोडवू शकत नाही आणि त्या समस्या संपतही नाहीत त्या फक्त वाढतच आहेत. या सर्व समस्या कोणासोबत शेअर करणे सुद्धा अपमानास्पद वाटते. या सर्व समस्या घेऊन मी जगूही शकत नाही. काही दिवसांनी या समस्या अजूनही वाढत जाणार, मी सहन करू शकत नाही. अगोदरच खुप त्रास सहन केला आहे. आता आजिबात सहन होत नाही. म्हणून मी माझ्या स्वत: च्या इच्छेने माझे जीवन संपवत आहे. माझ्या आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरू नये. पोलिसांनी कोणाचीही विचारपूस करण्याची गरज नाही.
Phulrani | दिवाळीत दरवळणार ‘फुलराणी’चा गंध, सुबोध भावे दिसणार रोमँटिक भूमिकेत!
India vs South Africa LIVE Score, 1st Test, DAY 1: भारताने टॉस जिंकला, मयंक-राहुलची चांगली फलंदाजी