सरपंचपदी विराजमान होण्याआधीच काळाचा घाला, भीषण अपघातात ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

खडकवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असल्याने विजया डोके यांना सरपंचपदाची संधी मिळणार होती. मात्र सरपंचपदी विराजमान होण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांचा मृत्यू झाला.

सरपंचपदी विराजमान होण्याआधीच काळाचा घाला, भीषण अपघातात ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू
टेम्पो-बाईक अपघातात तिघांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 3:37 PM

शिरूर / पुणे, सुनील थिगळे (प्रतिनिधी) : भरधाव टेम्पोने बाईकला धडक दिल्याने बाईकवरील खडकवाडी ग्रामपंचायत सदस्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर जवळील धामारी येथे बेल्हे जेजुरी महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात माय लेकांसह एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. संकेत डोके, विजया डोके आणि ओंकार सुक्रे अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. विजया डोके या खडकवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या होत्या आणि लवकरच सरपंचपदी विराजमान होणार होत्या. या दुर्दैवी घटनेने खडकवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

सरपंचपदी विराजमान होण्याआधीच काळाचा घाला

खडकवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असल्याने विजया डोके यांना सरपंचपदाची संधी मिळणार होती. मात्र सरपंचपदी विराजमान होण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांचा मृत्यू झाला.

पुजेच्या कार्यक्रमाला जात असताना अपघात

पुजेच्या कार्यक्रमासाठी तिघे जण एकाच बाईकवरु चालले होते. यावेळी बेल्हे – जेजुरी मार्गावर धामारी परिसरात भरधाव टेम्पोने त्यांच्या बाईकला धडक दिली. या अपघातात विजया डोके यांच्यासह त्यांचा मुलगा आणि त्याचा मित्र ठार झाले.

हे सुद्धा वाचा

तिघांच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

संकेत डोके आणि ओंकार सुक्रे हे दोघेही लहानपणापासून जिवलग मित्र होते. दोघांनी जगाचा निरोपही एकत्र घेतला. तिघांच्या अपघाती मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बुलढाण्यात एसटीला अपघात

मेहकरहून खामगावकडे निघालेल्या एसटी बसला अपघात झाल्याची घटना आज बुलढाण्यात घडली आहे. खामगाव मेहकर मार्गावरील पाथर्डी घाटात बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाला. अपघातात बस झाडाला धडकून अडकल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात 11 प्रवासी जखमी झाले. जखमींना मेहकर रुग्णालय हलविण्यात आलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.