अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती, रुग्णालयात उपचार सुरु

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर आज (31 मे) संध्याकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला (two unknown accused firing on NCP Leader Raviraj Taware in Malegaon Baramati)

अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती, रुग्णालयात उपचार सुरु
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 10:14 PM

बारामती (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर आज (31 मे) संध्याकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात तावरे यांच्या पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुका हादरला आहे. रविराज तावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. तसेच ते जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती आहेत. माळेगावातील एक मोठी प्रस्थ म्हणून त्यांची ओळख आहेत. त्यांच्यावर अशाप्रकारे अचानक गोळीबार झाल्याने बारामतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे (two unknown accused firing on NCP Leader Raviraj Taware in Malegaon Baramati).

नेमकं काय घडलं?

रविराज हे पत्नीसह संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या ऑडी कारने संभाजीनगर येथे वडापाव घेण्यासाठी आले होते. ते वडापाव घेण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्यांनी वडापाव विकत घेतला. दुकानदाराला पैसे दिले. त्यानंतर ते गाडीच्या दिशेला वळले. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात रविराज यांच्या पोटात गोळी लागली आणि ते जमिनीवर कोसळले.

बारामतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु

यावेळी त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे गाडीतच होत्या. हे सर्व डोळ्यांसमोर घडताना बघून त्यांना धक्का बसला. त्यांनी गाडीखाली येऊन आरडाओरड सुरु केली. त्यानंतर आजूबाजूचे नागरीक तिथे दाखल झाले. मात्र, तोपर्यंत हल्लोखेर दुचाकीवरुन पसार झाले. रविराज यांच्या मित्रांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळेचा विलंब न करता तावरे यांना तातडीने बारामतीत एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. उपचारासाठी पुण्याहून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येत आहे. दरम्यान, त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आरोपींनी गोळीबार का केला? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तसेच गोळीबार करणाऱ्यांचा शोध सध्या पोलिसांकडून सुरु आहे (two unknown accused firing on NCP Leader Raviraj Taware in Malegaon Baramati).

Raviraj Taware

रविराज तावरे

हेही वाचा : संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दूर केला, गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.