Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri chinchawd crime | पिंपरीत पाण्याच्या टँकर खाली चिरडल्याने दोन वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू

सोसायटीच्या मेन गेट समोर दोन वर्षाचं बालक खेळत होता. त्यावेळी तिथे आलेल्या टँकरची त्याला  धडक  बसली. यातच तो चिरडला गेला व त्याचा मृत्यू झाला. दोन वर्षांच्या बालकाच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Pimpri chinchawd crime | पिंपरीत पाण्याच्या टँकर खाली चिरडल्याने दोन वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू
दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 6:02 PM

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात चिखली जाधववाडी परिसरातील सोसायटीत खेळत असलेल्या चिमुरड्याला टँकरने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऐश्वर्यम हमारा सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. यात दोन वर्षाच्या बाळाचा करुण अंत झाला आहे.

अशी घडली घटना जाधववाडी परिसरात ऐश्वर्यम हमारा सोसायटी आहे. घटनेच्यावेळी सोसायटीच्या मेन गेट समोर दोन वर्षाचं बालक खेळत होता. त्यावेळी तिथे आलेल्या टँकरची त्याला  धडक  बसली. यातच तो चिरडला गेला व त्याचा मृत्यू झाला. दोन वर्षांच्या बालकाच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. बालकाच्या मृत्यूमुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी टँकर चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटना घडल्यानंतर टँकर चालक पळून गेला आहे. सोमेश मेहकर (रा. चिखली), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी रिजाजउद्दीन रोजअली मनियार (२४, रा.जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

आईसोबत खेळत होता बालक

पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार या दोन वर्षाची आजी (फिर्यादीची आई ) बाळला सायकल खेळण्यासाठी खाली घेऊन आलया होत्या. त्याचदरम्यान आरोपी सोमेश मेहकर हा पाण्याचा टॅंकर घेऊन आला. त्याच्या टॅंकरचा धक्का बाळाच्या सायकलीला लागला. सायकल पडल्याने टँकर खाली आल्याने चिरडले गेले व त्यातच त्याचा मृत्यू झाला.

50MP ट्रिपल कॅमेरा, किफायतशीर किंमत, Vivo Y21T ठरणार नव्या वर्षात लाँच होणारा पहिला स्मार्टफोन

Rajesh Tope : ‘सध्या राज्यात लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कायम असणार’

IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.