पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात चिखली जाधववाडी परिसरातील सोसायटीत खेळत असलेल्या चिमुरड्याला टँकरने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऐश्वर्यम हमारा सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. यात दोन वर्षाच्या बाळाचा करुण अंत झाला आहे.
अशी घडली घटना
जाधववाडी परिसरात ऐश्वर्यम हमारा सोसायटी आहे. घटनेच्यावेळी सोसायटीच्या मेन गेट समोर दोन वर्षाचं बालक खेळत होता. त्यावेळी तिथे आलेल्या टँकरची त्याला धडक बसली. यातच तो चिरडला गेला व त्याचा मृत्यू झाला. दोन वर्षांच्या बालकाच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. बालकाच्या मृत्यूमुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी टँकर चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटना घडल्यानंतर टँकर चालक पळून गेला आहे. सोमेश मेहकर (रा. चिखली), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी रिजाजउद्दीन रोजअली मनियार (२४, रा.जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.
आईसोबत खेळत होता बालक
पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार या दोन वर्षाची आजी (फिर्यादीची आई ) बाळला सायकल खेळण्यासाठी खाली घेऊन आलया होत्या. त्याचदरम्यान आरोपी सोमेश मेहकर हा पाण्याचा टॅंकर घेऊन आला. त्याच्या टॅंकरचा धक्का बाळाच्या सायकलीला लागला. सायकल पडल्याने टँकर खाली आल्याने चिरडले गेले व त्यातच त्याचा मृत्यू झाला.
50MP ट्रिपल कॅमेरा, किफायतशीर किंमत, Vivo Y21T ठरणार नव्या वर्षात लाँच होणारा पहिला स्मार्टफोन
Rajesh Tope : ‘सध्या राज्यात लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कायम असणार’
IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम