TET Exam : तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केलं! एका परीक्षार्थीकडून किती रुपये घेतले?

TET Exam Scam : तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांकडून याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे.

TET Exam : तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केलं! एका परीक्षार्थीकडून किती रुपये घेतले?
टीईटी प्रकरणी महत्त्वाची अपडेट
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 9:43 AM

पुणे : पुणे टीईटी परीक्षेबाबत एक धक्कादायक अपडेट हाती येतेय. टीईटी परीक्षेत मोठा घोटाळा झाला असल्याच बाब उघड झाल्यानंतर आता किती जणांना पैसे देऊन पात्र करण्यात आलं, याची आकडेवारीदेखील समोल आली आहे. तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांकडून याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे. या तपासातून 7 हजार 800 जणांना पैसे देऊन पात्र केलं असल्याची बाब उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी मोठा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांच्या तपासातून आणखी मोठे आकडे समोर येण्याचीही दाट शक्यता आहे. पुणे सायबर पोलिसांना (Pune Cyber Police) आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार (TET Exam Scam) झाल्याप्रकरमी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते. मात्र सायबर पोलिसांतून अनेकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे काही काळ याप्रकरणाचा तपास थंडावला होता. मात्र आता पुन्हा एकदा याप्रकरणी तपासाला वेग आला आहे.

आतापर्यंत कुणाकुणाला अटक!

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe), माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून ही आता रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.

पुणे पोलीस टीईटी गैरव्यवहार प्रकरणात पैसै घेणाऱ्या दलालांच्या शोधात आहेत. पुणे सायबर पोलिसांच्या रडारवर टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील एजंटांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार यानं पोलीस तपासात अभिषेक सावरीकरनं पाच कोटी दिल्याची कबुली दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला होता. त्या अनुषंगाने पुणे पोलीस पुढील तपास करत आहेत.

सायबर पोलीस करणार एजंटांची तपासणी

पुणे सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा प्रकरणी तपासाची चक्र वेगवान केली आहेत. टीईटी परीक्षा प्रकरणी न्यायालयातही सुनावणी सुरु झाली आहे. अभिषेक सावरीकरला पैसे देणाऱ्या एजंटांचा पोलीसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून आता एजटांची तपासणी करण्यात येणार आहे. 2018 साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विनकुमार याला अभिषेक सावरीनं 5 कोटी रुपये दिल्याचं पोलिस तपासात उघड झालं होतं. ज्या परीक्षार्थीकडून पैसे घेतले त्यांचाही शोध घेतला जातोय. दरम्यान, तब्बल सात हजारपेक्षा जास्त लोकांना पैसे देऊन पात्र केल्याचं आता समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

Aurangabad | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्धाटनाचा वाद पेटण्याची शक्यता

Shattila Ekadashi | षटतीला एकादशीचे औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट

129 मुलांचा बाप असलेला हा ‘विकी डोनर’ तगडा आहे! या वर्षी त्यात आणखी 9 मुलांची भर पडणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.