वनराज आंदेकर हत्या प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश, कोंबिंग ऑपरेशन सुरु असताना…
vanraj andekar murder case: गणपती उत्सवाच्या काळात पुणे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरु केले होते. सागर पवार आणि साहिल उर्फ टक्या दळवी हे फरार होते. त्यांना कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अटक करण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा युनिट एक गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी कक्षाने त्यांना पकडले.
पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात वनराज आंदेकर यांच्या बहिणी होत्या. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत तीन अल्पवयीनांसह २१ जणांना अटक केली आहे. आता या प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. साहिल ऊर्फ टक्या दळवी याच्यासह आणखी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन सुरु असताना हे आरोप मिळून आले.
या दोन आरोपींना अटक
गणपती उत्सवाच्या काळात पुणे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरु केले होते. सागर पवार आणि साहिल उर्फ टक्या दळवी हे फरार होते. त्यांना कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अटक करण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा युनिट एक गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी कक्षाने त्यांना पकडले. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार सोमनाथ गायकवाड, शुभम दहिभाते, वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती प्रकाश कोमकर आणि तिचा मेहुणा गणेश यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेले कोयते (तीक्ष्ण हत्यार) आणि पिस्तूल पुरवणारा आरोपी संगम वाघमारे यालाही पोलिसांनी पकडले आहे.
या अधिकाऱ्यांना केली कारवाई
सागर पवार आणि साहिल उर्फ टक्या दळवी या फरार आरोपींना युनिट 1 गुन्हे शाखेने अटक केली. पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद व युनिट 2 चे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहटे, सहायक पोलिस फौजदार मक्रे, पोलिस अधिकारी दत्ता सोनवणे, नीलेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
वनराज आंदेकर आणि त्याच्या बहिणीच्या घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वनराज आंदेकर यांचा खुनाचा कट सोमनाथ गायकवाड यांच्यासह प्रकाश व गणेश कोमकर यांनी रचला होता. फरार आरोपींचा माग काढण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनेक पथके तैनात केली होती. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी पोलीस कोठडीत आहे.