पिंपरी चिंचवड – उच्च शिक्षण , नामांकित कंपनीत चांगल्या नोकरी , फिरायला महागडी कार असे दाखवत तरुणीना आपल्या जाळयात ओढायचे. नंतर त्याच्यासोबत फिरून त्यांच्यावर स्वतःचा प्रभाव पडायचा. तरुणीवरील पकड मजबूत झाली कि तिला लग्नाचे आमिष दाखवत तिची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. निशांत रमेशचंद्र नंदवाना आणि विशाल हर्षद शर्मा अशी अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत. दोन्ही आरोपींनी मिळून पुणे, बंगळुरु आणि गुडगाव येथील एकूण 255 मुलींना फसवल्याचे समोर आले आहे. मला काही लाख रुपये कमी पडत आहेत असे ते मुलींना सांगत
असे करायचे फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मॅट्रोमोनियल वेबसाईटवरुन तरुणींशी ओळख निर्माण करायचे. त्यानंतर त्यांच्याशी जवळीक वाढवून भेट, फोन, चॅटिंग सुरु करायचे . त्यानंतर मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगत ब्रँडेड कार मधून त्यांना फिरवयाचे. तरुणींचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना आपण कस्टमचा व्यवसाय करू म्हणजे भविष्यात आपण सेटल होऊ असे सांगायचे. त्यासाठी तरुणींकडून लाखो रुपये उकळत होते. त्यानंतर काही दिवस तरुणींच्या सोबत राहून नंतर फरार होत. मोबाईल बंद करून टाकत असत.आतापर्यंत या दोघांनी तब्बल दीड कोटीहून अधिक रुपयांचा आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . फसवणुकीस्तही
फसवणुकीसाठी करायचे वेगवेगळ्या नावाचा वापर
आरोपी निशांत आणि विशाल हे दोघे मॅट्रोमोनियल वेबसाईटवरुन तरुणींशी जवळीक साधायचे. अगोदर त्यांचा विश्वास संपादन करून मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे आरोपी भासवत. त्यानंतर, भेट, फोन, चॅटिंग वाढल्यानंतर महागड्या गाड्यांमधून तरुणींना फिरत असत. त्यामुळे मुलींना दोघांवर अधिकच विश्वास बसत असे. आपण कस्टमच्या व्यवसाय करू पण त्यामध्ये मला काही लाख रुपये कमी पडत आहेत असे ते मुलींना सांगत. आपलं लग्न होणार असून हा व्यवसाय केल्यास आपलं भविष्य सेट होईल असे म्हणून तरुणींकडून लाखो रुपये उकळत होते. काही दिवस तरुणीच्या संपर्कात राहून दोन्ही आरोपी पसार व्हायचे. त्यानंतर मोबाईल बंद करून टाकत. आत्तापर्यंत दोन्ही आरोपींनी 255 तरुणींना फसवलं असून दीड कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
वेगवेगळ्या शहरात विविध नावांचा करायचे वापर
आरोपी निशांत रमेशचंद्र नंदवाना हा पुण्यात अधितांश अग्निहोत्री, बंगळुरु येथे अभय कश्यप आणि गुरगावमध्ये आधव अग्निहोत्री अशी बनावट नावे वापरून तरुणींना फसवत असता. दुसरा आरोपी विशाल हर्षद शर्मा हा पुण्यात आश्विक शुक्ला, बंगलोर येथे अथर्वन तिवारी आणि गुरगावमध्ये अव्यागृह शुक्ला, रुद्रान्स शुक्ला, देवांश शुक्ला किंवा अचैत्य शुक्ला नावाने तरुणींना फसवत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या फसवणुकी दरम्यान अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपीच्या विरोधात वाकड पोलिसांत तक्रार आल्यानंतर तपासाची चक्रे वेगवान फिरवण्यात आली. बंगळुरू येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्या पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपी हे वेगवेगळ्या नावाने राहात असल्याचं समोर आले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचं निधन
या पाच सोप्या पध्दतीने करा ईपीएफ खात्यात नोकरी सोडण्याची तारीख ऑनलाइन अपडेट…