Pune crime|अंध व्यक्तीला लाखोंचा गंडा; लग्नानंतर सात महिन्यातच पत्नी दागिने व पैसे घेऊन पळाली
पीडिताच्या समाजातील कैलासकुमार सिंघवी या व्यक्तीने मध्यस्थी करत त्यांच्या साठी मुली सुचविण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सारिका बंब नावाच्या मुलीचं स्थळ त्यांना सुचवलं. परंतु या लग्नासाठी तुम्हाला मुलीच्या घरच्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले. तुम्ही जर पैसे दिले तरच मुलगी लग्न करण्यास तयार असल्याचं सांगितलं. त्या मध्यस्थी कैलासकुमार त्यांच्या सांगण्यानुसार पीडित फिर्यादी चौधरी हे पैसे देण्यास तयारही झाले. त्यांनी वेळोवेळी आरोपी व तिच्या कुटुंबियांना ८ लाख ७३ हजार रुपये दिले.
पुणे- पैश्याच्या हव्यासापोटी अंध व्यक्तीशी लग्न करून तरुणीने त्याला तब्बल ९ लाख रुपयाला गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी पत्नीनं लग्न जुळवणाऱ्या व्यक्तीची मदतीने ही फसवणूक केली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस स्थानकात कथित पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विनोद केसाराम चौधरी(30) असे फिर्याचे नाव आहे. चौधरी हे दोन्ही डोळ्यांनी अंध असून रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) कार्यरत आहेत. दोन्ही डोळ्यांने अंध असल्याने त्यांचे लग्न जमन्यात अनेक अडचणी येत होत्या. लग्नासाठी अनेक मुली त्यांनी बघितल्या होत्या, तरीही त्यांचे लग्न जुळत नव्हते.
लग्नासाठी द्यावे लागतील पैसे याचा दरम्यान पीडिताच्या समाजातील कैलासकुमार सिंघवी या व्यक्तीने मध्यस्थी करत त्यांच्यासाठी मुली सुचविण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सारिका बंब नावाच्या मुलीचं स्थळ त्यांना सुचवलं. परंतु या लग्नासाठी तुम्हाला मुलीच्या घरच्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले. तुम्ही जर पैसे दिले तरच मुलगी लग्न करण्यास तयार असल्याचं सांगितलं. त्या मध्यस्थी कैलासकुमार त्यांच्या सांगण्यानुसार पीडित फिर्यादी चौधरी हे पैसे देण्यास तयारही झाले. त्यांनी वेळोवेळी आरोपी व तिच्या कुटुंबियांना ८ लाख ७३ हजार रुपये दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपी सारिका बंबने चौधरी यांच्यासोबत विवाह केला. विवाहानंतर तिने सात महिने फिर्यादीसोबत संसार केला. पण त्या नंतर मात्र पत्नी कविताने फिर्यादीने तिला लग्नात घातलेले दागिने व २० हजाराची रक्कम घेऊन घरातून पळ काढला.
आधार कार्ड निघाले बनावट
पत्नी घरातून गायब झाल्यानंतर फिर्यादी यांनी पत्नी सारिकाला फोन लावला. तेव्हा मी थोडाच दिवसात परत येईन असे आश्वासन पत्नीनं दिले. त्यानंतर बरेच दिवस झाल्यानंतर पत्नी परत न आल्यानं त्यांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी सारिकानं आपला फोन बंद करून ठेवला होता. संबंधित महिलेचं आधारकार्ड तपासलं तारा तेही बनावाट असल्याची माहिती समोर आली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे विजय चौधरी यांच्या लक्षात येताच त्यांनीपोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील पोलीस विमानतळ पोलीस करत आहेत.
हेही वाचा:
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट? मुंबई सेंट्रल आगारातून पहिली एसटी धावली; राज्यात 826 एसटी रस्त्यावर
कोरोनाची लस न घेतल्याने चौघांचा मृत्यू; लस बंधनकारकच; जिनोम सिक्वेसिंगचा निष्कर्ष