नोकरीसाठी मुलाखत देण्याच्या बहाण्याने बोलावले, मग तरुणीसोबत नको ते करण्याचा प्रयत्न
शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती नोकरीच्या शोधात होती. एका कंपनीत नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. तरुणी मुलाखतीसाठी गेली, पण मग जे घडलं त्याची तिने कल्पनाही केली नसेल.
पिंपरी चिंचवड : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचे नावच घेत नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पुण्यामध्ये उच्चशिक्षित 28 वर्ष तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश्वर रेड्डी, चिरागउद्दीन शेख, नूरजहाँ शेख आणि अर्जुन ठाकरे अशी चौघा आरोपींची नावे आहेत.
बलात्काराचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी
पीडित तरुणी बी.कॉम झाली असून, नोकरीसाठी प्रयत्न करत होती. यादरम्यान, आरोपींनी तिला नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावले होते. मुलाखतीच्या निमित्ताने बोलावून महेश्वर रेड्डी, चिरागउद्दीन शेख, नूरजहाँ शेख आणि अर्जुन ठाकरे यांनी तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पीडित तरुणीने पत्राद्वारे न्याय मागितला असून आरोपींना लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे.
ऑनलाईन नोकरी शोधाताना आरोपींच्या संपर्कात
पश्चिम बंगाल येथील 28 वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात होती. ऑनलाइनद्वारे नोकरी शोधत असताना एका तरुणीचा तिला नंबर मिळाला. तिच्याशी पीडित तरुणीने संपर्क केला. संबंधित मुलीने पुण्यातील हिंजवडीत पीडितेला इंटरव्यूसाठी बोलवण्यात आलं. विश्वासाने ती पुण्यात आली. मात्र हा सगळा प्रकार घडल्यानंतर अखेर तरुणीने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे शहरातील लष्कर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय.