पुण्यात थरार, 5 कोटींची खंडणी, तोतया पत्रकारांना पोलिसांचा सुगावा, तरीही खंडणीखोरांच्या नांग्या ठेचल्या

दोघा आरोपींनी एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितली होती. ठरल्याजागी व्यावसायिक खंडणीचे पैसे घेऊन गेला. पण गुन्हेगारांना पोलिसांची चाहूल लागली अन् पुणे-सोलापूर महामार्गावर थरार पहायला मिळाला.

पुण्यात थरार, 5 कोटींची खंडणी, तोतया पत्रकारांना पोलिसांचा सुगावा, तरीही खंडणीखोरांच्या नांग्या ठेचल्या
पुण्यात खंडणीखोरांकडून पोलिसांना मारण्याचा प्रयत्नImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 9:52 PM

पुणे : पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचं नावच घेताना दिसत नाही. गुन्हेगारांनी आता पोलिसांनाही सोडले नाही. पुण्यात अशीच एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाकडे खंडणी मागायला गेलेल्या आरोपींनी चक्क पोलिसांनाच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनीही प्रसंगावधान राखत आरोपींच्या गाडीवर दोन राऊंड फायर केले. मात्र पोलिसांनीही हार न मानता फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोघेही खंडणीखोर तोतया पत्रकार असल्याचे समोर आले आहे. गाडी अंगावर घातल्याने एका पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

एका व्यावसायिकाकडे खंडणीची मागितली होती

पुण्यातील एका व्यवसायिकाला ब्लॅकमेल करत आरोपींनी त्याच्याकडे पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती 50 लाखांची खंडणी देण्याचे ठरले. व्यापाऱ्याने तात्काळ पोलिसात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेचा प्लान रचला. त्यानुसार ठरल्या जागी खंडणीचे पैसे घेण्यासाठी आरोपी आधीच येऊन थांबले होते.

खंडणीखोरांकडून पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न

दरम्यान, व्यवसायिकासोबत पोलीस असल्याची चाहूल लागताच, दोघांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी पिस्तुलातून दोन राऊंड गाडीच्या पाठीमागील चाकावर फायर केले. त्यानंतर मदतीसाठी आलेले पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने दोघा खंडणीखोरांना पकडले. दोघा खंडणीखोरांना पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्याच्या परिसरात पाठलाग करून पकडले.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.