Drink & Drive Case : रक्तात किती प्रमाणात अल्कोहल सापडल्यावर ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल होतो? ही बातमी वाचा

Drink & Drive Case : ज्यावेळी कुठलाही माणूस दारु पितो, तेव्हा किती टक्के अल्कोहल पोटात? किती टक्के आतड्यांमध्ये मिसळतं? त्यानंतर रक्तात मिसळून दारु शरीरात पसरते. दारु रक्त्तात मिसळल्यानंतर तीन पद्धतीने शरीराबाहेर येते. ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा कधी दाखल होतो? काय कायदा आहे? समजून घ्या.

Drink & Drive Case : रक्तात किती प्रमाणात अल्कोहल सापडल्यावर ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल होतो? ही बातमी वाचा
Follow us
| Updated on: May 29, 2024 | 1:04 PM

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राइव्हचा विषय चर्चेत आला आहे. पुण्यात अल्पवयीन आरोपीने कल्याणीनगर भागात भरधाव वेगाने पोर्शे कार पळवून दुचाकीस्वाकाराला उडवलं. या घटनेत एका तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. अपघाताच्यावेळी अल्पवयीन आरोपीने मद्य प्राशन केल्याचा आरोप आहे. अपघातापूर्वी पबमधील त्याचं दारु पितानाच सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. आता पुण्याच्या ससून रुग्णालयात ब्लड सॅम्पल बदलण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ब्लड सॅम्पलमुळे आरोपी दारुच्या नशेत होता, हे सिद्ध होऊ शकतं. अशा प्रकरणात रक्तात किती प्रमाणात अल्कोहल सापडल्यावर ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल होतो? श्वासाद्वारे एखाद्याने मद्यपान केलय की, नाही हे पोलिसांना कसं समजत? त्या बद्दल जाणून घेऊया.

एखादी व्यक्ती दारु पिऊन गाडी चालवत आहे की नाही? हे शोधून काढण्यासाठी पोलीस ब्रीथ एनालाइजर मशीनचा वापर करतात.

ब्रीथ एनालइजर टेस्टमध्ये रक्तात दारुच प्रमाण किती आहे ते समजत. 100 एमएल रक्तात 30 एमजी अल्कोहल सापडलं, तर ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल होतो.

तोंड, गळा, पोट आणि आतड्यांच्या माध्यमातून दारु रक्तात मिसळते. कारण दारु पचत नाही. रक्त फुप्फुसांमधून प्रवाही असताना अल्कोहल श्वासांवाटे हवेत येतं.

ब्रीथ एनालाइजरमध्ये श्वास सोडल्यानंतर हे उपकरण रक्त्तात किती प्रमाणात दारु आहे, त्याची माहिती देतं. ड्रायव्हरच ब्लड सॅम्पल घेतल्याशिवाय शरीरात किती प्रमाणात दारु आहे, त्याची माहिती मिळते.

अमेरिकन मेडिकल असोसिएशननुसार, जेव्हा 100 एमएल ब्लडमध्ये अल्कोहलच प्रमाण 50 एमजी असतं, त्यावेळी ती व्यक्ती पूर्ण शुद्धीत नसते. म्हणून 100 एमएल ब्लडमध्ये 30 एमजी अल्कोहल सापडल्यानंतर ड्रिंक अँड ड्राइव्हची केस बनते.

ज्यावेळी कुठलाही माणूस दारु पितो, तेव्हा 20 टक्के अल्कोहल पोटात आणि 80 टक्के आतड्यांमध्ये मिसळतं. त्यानंतर रक्तात मिसळून दारु शरीरात पसरते.

दारु रक्त्तात मिसळल्यानंतर तीन पद्धतीने शरीराबाहेर येते. 5 टक्के टॉयलेट आणि 5 टक्के श्वासाद्वारे बाहेर येते. अन्य अल्कोहल एसिटिक एसिडमध्ये बदलतं. जी 5 टक्के दारु श्वासाद्वारे बाहेर येते तीच ब्रीथ एनालइजर टेस्टमध्ये सापडते.

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.