Devendra Fadnavis : पुण्यात बदलापूरसारखी घटना, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस स्थानकात अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा नराधम आरोपी चिमुकल्या मुलींवर गेल्या चार दिवसांपासून अत्याचार करत होता, अशी माहिती समोर आली आहे.
चंद्रपूरमध्ये शाळेच्या एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विषयात आरोपीवर कारवाई करण्याच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे बोलले आहेत. “आरोपीला अटक करण्यात आली आहे. अतिशय वाईट पद्धतीने त्याने शाळेत मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. त्याच्या विरोधात कठोर कारवाई पोलिसांकडून केली जाईल. त्याला कठोर शिक्षा देण्यात येईल” अस देवेंद्र फडणवीस म्हणाले. बलात्काराचा आरोपी अमोल लोदे राहुल गांधी विचार मंच अशी काँग्रेसची संघटना चालवतो. त्याच्या घरी काँग्रेसची नगरसेविका आहे. घरीच काँग्रेसचा जिल्ह्याचं पद आहे. त्या अमोल लोदेने शाळेत मुलींच लैंगिक शोषण केलं.
“पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार स्थानिक नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केली आहे. अशा घटनांमध्ये आम्ही पक्ष पाहत नाही. आरोपी आरोपी असतो. अशा आरोपी विरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्याला मदत करणाऱ्यांवर ही कठोर कारवाई केली जाईल” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकरणामध्ये आणखी काही मुली पीडित आहेत का? याची चौकशी सुरू आहे. लवकरच पोलीस यासंदर्भातली माहिती देतील.
संस्था चालकांनाही बोलावलं
“पुण्यात स्कूल व्हॅनमध्ये एका ड्रायव्हरने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळी एफआयआर नोंदवला. इतर मुलींची चौकशी केल्यानंतर त्याने आणखी एका मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याच लक्षात आलं. त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पॉस्को कायद्यात अशा प्रकारचा गुन्हा रेप मानला जातो. तसा गुन्हा दाखल केला आहे. कडक कारवाई केली जातेय. संस्था चालकांना बोलावण्यात आलं आहे, त्यांचा दोष आहे का? ते तपासलं जाईल” असं फडणवीस म्हणाले. “इतर सर्व शैक्षणिक संस्थांना सांगितलं जात आहे की विद्यार्थ्यांच्या ट्रान्सपोर्टेशनची जी काही पद्धत आहे. त्यामध्ये वाहन चालक म्हणून काम करणारे योग्य आहे की नाही, याची तपासणी केली पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.