पत्नीच्या नावे फेक अकाऊण्ट, आक्षेपार्ह फोटो पाठवत नवऱ्याचे तरुणांशी अश्लील चॅटिंग

पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्याने पतीने तिची बदनामी करण्यासाठी फेक फेसबुक अकाऊण्ट ओपन केलं (Husband Vulgar Photo of Wife )

पत्नीच्या नावे फेक अकाऊण्ट, आक्षेपार्ह फोटो पाठवत नवऱ्याचे तरुणांशी अश्लील चॅटिंग
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 12:06 PM

चंदिगढ : नाराज होऊन माहेरी गेलेल्या पत्नीची बदनामी करण्यासाठी नवऱ्याने निर्लज्जपणाची निचांकी पातळी गाठली. पत्नीच्या नावे फेक फेसबुक अकाऊण्ट ओपन करुन नवऱ्याने तिचे अश्लील फोटो शेजाऱ्यांना पाठवले. त्यानंतर तो शेजाऱ्यांशी अश्लील चॅटिंगही करु लगाला. पंजाबमधील बठिंडा शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Punjab Crime Husband Shares Vulgar Photo Videos of Wife on Fake Facebook ID Social Media)

संबंधित महिलेचा विवाह पंजाबच्या बठिंड्यातील सीयूल पत्ती मेहराज भागात राहणाऱ्या धरमिंदर सिंहसोबत झाला होता. धरमिंदरचा हा दुसरा विवाह होता. मात्र पतीचं वर्तन ठीक नसल्याच्या कारणास्तव ती माहेरी राहायला आली होती. दीर्घ काळापासून पटियालातील माहेरी राहत होती.

पत्नीच्या फेक अकाऊण्टवरुन पतीचं चॅटिंग

पती-पत्नीचं नातं हे विश्वासाचं असतं. पण जेव्हा नात्यांमधूनच विश्वास उडून जातो, तेव्हा हे नातं नाममात्र राहतं आणि घात करतं. पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्याने धरमिंदरचा तीळपापड होत होता. त्यामुळे तिची बदनामी करण्यासाठी त्याने अक्षरशः टोक गाठलं. त्याने पत्नीच्या नावे फेक फेसबुक अकाऊण्ट ओपन केलं. त्यानंतर तिच्या माहेराजवळ राहणाऱ्या व्यक्तींना त्याने या फेक आयडीवरुन फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर आक्षेपार्ह मेसेज करत तो अश्लील फोटो पाठवू लागला. या चॅट्सचे स्क्रीनशॉट तो पत्नीला पाठवत होता.

सायबर पोलिसात पत्नीची तक्रार

नवऱ्याच्या या घृणास्पद प्रकाराला वैतागून महिलेने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात आयटी अॅक्ट 2000 च्या कलम 68 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पतीला या प्रकरणी तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा पाच लाखांपर्यंत दंडही ठोठावला जाऊ शकतो.

अश्लील व्हिडीओ प्रकरणाची पुनरावृत्ती 

नागपुरात डिसेंबर 2018 मध्येही असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला होता. पतीच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून पीडितेने आपल्या माहेरी जाण्याची गोष्ट केली होती. परंतु, पतीने नकार दिला. काही दिवसांनी जेव्हा पती कामानिमित्त नागपूरला गेला, तेव्हा पत्नीने पळ काढून माहेर गाठलं. पण पत्नी माहेरी गेल्याची बाब आरोपी पतीला खटकली आणि त्याने पत्नीची बदनामी करत तिचा अश्लील व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला होता. त्यानंतर पतीला बेड्या ठोकण्याक आल्या होत्या.

संबंधित बातम्या :

पत्नीशी पटेना, नवऱ्याने फेसबुकवर तिचाच अश्लील व्हिडीओ टाकला

परदेशी तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुंबईत अभिनेत्याला अटक

(Punjab Crime Husband Shares Vulgar Photo Videos of Wife on Fake Facebook ID Social Media)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.