नऊ दिवसांपूर्वीच लग्न, माहेरी येऊन विवाहितेची प्रियकरासोबत आत्महत्या

माहेरी आलेली लेक दुकानात सामान आणण्याच्या निमित्ताने बाहेर पडली. मात्र बराच वेळ घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरु केली, त्याच वेळी तिने गावातील तरुणासोबत पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं

नऊ दिवसांपूर्वीच लग्न, माहेरी येऊन विवाहितेची प्रियकरासोबत आत्महत्या
विवाहितेची प्रियकरासह आत्महत्या
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 2:53 PM

चंदिगढ : नऊ दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणीने माहेरी येऊन प्रियकरासोबत आत्महत्या केली. सासरहून पहिल्यांदा माहेरी आली असताना 19 वर्षांची विवाहिता आधी बॉयफ्रेण्डला भेटली. त्यानंतर दोघांनी गावाबाहेरील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पंजाबमधील मुक्तसर साहिबमधील किल्लियावाली गावात ही घटना घडली. (Punjab Newly Married Girl returns Home to commit Suicide with Boyfriend)

सासरहून पहिल्यांदाच माहेरी

संबंधित तरुणीचं अवघ्या 9 दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. तरुणीचं गावातील तरुणावर प्रेम होतं. मात्र कुटुंबीयांनी तिचं लग्न लावून दिलं. सासरहून पहिल्यांदा माहेरी आल्यावर तिने प्रियकराची भेट घेतली. यावेळी दोघांनी जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.

तरुणासोबत पाण्याच्या टाकीत उडी

माहेरी आलेली लेक दुकानात सामान आणण्याच्या निमित्ताने बाहेर पडली. मात्र बराच वेळ ती घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली, त्याचवेळी तिने गावातील तरुणासोबत पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं. आत्महत्या करण्यापूर्वी लग्नात घातलेल्या नव्या बांगड्या तिने फोडल्याचं पाहायला मिळालं. या घटनेमुळे माहेरच्या मंडळींना मोठा धक्का बसला.

आपल्या मुलीच्या प्रेम प्रकरणाबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हती, असा दावा कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत केला. दोघांचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. दुहेरी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

औरंगाबादेत प्रियकरापाठोपाठ प्रेयसीची आत्महत्या

दरम्यान, ज्या प्रियकरासोबत विवाह करण्याचं नियोजन झालं होतं, त्या मुलानेच आत्महत्या केल्यामुळे तणावातून 17 वर्षीय मुलीनेही गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला होता. खुशीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांना विवाह करायचा होता. यासाठी दोघांनी आपापल्या कुटुंबीयांनाही राजी केले होते. तीन महिन्यांपूर्वी दोघांचा विवाहही ठरवण्यात आला होता. मात्र विवाह ठरलेल्या तरुणाने 15 दिवसांपूर्वी अचानक टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. यामुळे खुशीही दोन आठवड्यांपासून मानसिक तणावात असल्याचं बोललं जातं.

संबंधित बातम्या :

धावत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची चाकू भोसकून हत्या, सात दिवसात तुरुंगात प्रियकराची आत्महत्या

गर्भवती प्रेयसीवर 12 तास सामूहिक बलात्कार, दु:ख सहन न झाल्याने प्रियकराची आत्महत्या

(Punjab Newly Married Girl returns Home to commit Suicide with Boyfriend)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.