Raj Kundra arrest : राज कुंद्रांचा ‘डर्टी पिक्चर’ कसा उघडा पाडला? मुंबई पोलिसांनी A टू Z सांगितलं
राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे या दोघांना मुंबई सत्र न्यायालयानं 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांचे पाय अधिक खोलात गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे या दोघांना मुंबई सत्र न्यायालयानं 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. (Mumbai Police Press Conference on Raj Kundra Arrest Case)
मुंबई पोलिसांचे धक्कादायक खुलासे
फेब्रुवारी 2021 मध्ये मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपासात अस निष्पन्न झाल होत की नवोदित महिला कलाकारांना वेबसिरीज किंवा मालिकेत काम मिळवून देतो असे सांगून अमिश दाखवून बोलावलं जायचं आणि त्यामध्ये अश्लील व्हिडिओ शूट केले जायच. अश्या काही तक्रारी क्राईम ब्रांचकडे प्राप्त झालेल्या होत्या त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वेब सीरिज किंवा फिल्म्समध्ये संधी देतो असं आमिष दाखवलं जायचं. ऑडिशन्स घेतलं जायचं, त्यावेळी सेमी न्यूड आणि न्यूड सीन्स घेतले जात. त्यातील काही महिलांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. याचा तपास करत असताना असं दिसलं, छोट्या क्लिप्स तयार करुन काही वेबसाईट्स आणि काही मोबाईल अॅप्सला विकल्या जात होत्या.
Actress Shilpa Shetty’s husband & businessman Raj Kundra and one Ryan Tharp brought to Mumbai’s Esplanade Court.
Kundra was arrested yesterday while Tharp was arrested today in connection with a case relating to the production of pornographic films. pic.twitter.com/NCpbVeKhJH
— ANI (@ANI) July 20, 2021
असे व्हिडिओ बनवून काही वेबसाईट्स आणि ओटीटी प्लेटफॉर्मसाठी विकले जात होते. या वेबसाईट्स आणि अप्लिकेशनच सबस्क्रिप्शन घेऊन मेम्बरशीप दिली जात होती. उमेश कामत नावाचा व्यक्ती या प्रकरणात इंडिया हेड होता तो राज कुंद्रा यांच्या कंपनीत काम करत होता.
सर्व महत्त्वाचे धागेदोरे मिळाले- पोलीस
राज कुंद्रा यांची व्हिआन नावाची कंपनी आहे तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायप झालेलं होतं, ती लंडनची कंपनी आहे. ही कंपनी राज कुंद्रा यांचे नातेवाईक बहिणीचा नवरा लंडनमधून चालवतो. त्यांचं अॅप होतं हॉटशॉट हे सर्व लंडनमधून सुरु होतं. मात्र कंटेट आणि अॅपचं ऑपरेशन, अकाऊंटिंग राज कुंद्रांच्या व्हिआन कंपनीमार्फत व्हायचं. काल कोर्टाची परवानगी घेऊन सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्यामद्ये सर्व महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानंतरच राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी यांना अटक करण्यात आलीय.
हॉटशॉट या अॅपवर पोर्नोग्राफी असल्याने, अॅपल स्टोअर आणि गुगल स्टोअरने डाऊन केलं आहे. त्यामुळे ते अॅप नाहीत. वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून हे काम करतं. कालपर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. पोर्नोग्राफी फिल्म प्रोड्युस करुन, रोहा खान आणि तिचा पत्नी, गहना वशिष्ठ, तन्वीर हाश्मी, उमेश कामत यांचा समावेश आहे.
पॉर्न रॅकेट प्रकरणात एकूण 5 गुन्हे दाखल
काही तांत्रिक पुरावे व्हेरिफाय करायचे होते त्याअनुषंगाने तपास सुरू होता. ते मिळाल्यानंतर आम्ही राज कुंद्रा यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर ही कारवाई केलीय. आम्हाला सबस्क्रिप्शन्स, अॅग्रिमेंटचे पेपर आणि काही अश्लील व्हिडिओ शिवाय अजून काही तांत्रिक पुरावे हाती लागले आहेत. पॉर्न रॅकेट प्रकरणात एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य सायबर सेलमध्ये 1, मालवणी पोलीस ठाण्यात 2, गुन्हे शाखेत 1, आणि लोणावळा पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. अजून काही ऍप्लिकेशन आहेत जी हा गोरखधंदा करत होते त्यांचा तपास सुरू आहे. आतापर्यंत साडेसात कोटी रुपये बँकांमध्ये फ्रीज करण्यात आले असल्याचंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
Mumbai Police Press Conference on Raj Kundra Arrest Case