नवरी बारा वेळा बोहल्यावर चढली, बाराव्या ‘सासरी’ अशी अडकली नि पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नेहा वेगवेगळ्या बहाण्याने घर सोडून जायची आणि लग्न करायची. यानंतर, संधी मिळताच ती मुलाच्या घरातून पळून जायची. कधी ती मित्रांच्या लग्नाला जात असल्याचं आईला सांगायची, तर कधी मैत्रिणींसोबत फिरायला जात असल्याचं कारण द्यायची.

नवरी बारा वेळा बोहल्यावर चढली, बाराव्या 'सासरी' अशी अडकली नि पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बारा लग्न करणाऱ्या तरुणीला बेड्या
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 3:09 PM

जयपूर : राजस्थानच्या चित्तौडगढमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने एक-दोन नव्हे तर डझनभर मुलांशी विवाह रचला. पोलिसांनी या रॅकेटचा भांडाफोड केला, मात्र तिने नेमकी किती जणांची फसवणूक केली, याची अद्याप मोजदाद नाही. धक्कादायक म्हणजे तरुणीचा प्रताप तिच्या आई-वडिलांना माहितही नव्हता. नेहा असे आरोपी तरुणीचे नाव असून पोलिसांनी तिच्यासह तिच्या साथीदार सीमा शेख आणि लक्ष्मी यांनाही पकडलं आहे. पोलीस या सर्वांची चौकशी करत आहेत.

कसा झाला भांडाफोड

लग्नाच्या नावावर फसवणूक करणाऱ्या या टोळीचा भांडाफोड तेव्हा झाला, जेव्हा स्वतः नेहाने तिच्या आईसोबत पोलीस स्टेशनला जाऊन सीमा शेख, साबीर खान आणि लक्ष्मी यांच्याविरुद्ध तक्रार केली. तिघांनी आपले अपहरण केले होते, मात्र मोठ्या कष्टाने आपण त्यांच्या तावडीतून निसटल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. पण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा नेहाच त्यांच्या टोळीची सूत्रधार निघाली. सीमा शेख, साबीर खान आणि लक्ष्मी तिचे साथीदार असल्याचे आढळले.

कारणं देऊन घरातून पळायची

विशेष म्हणजे नेहाच्या आईलाही तोपर्यंत तिच्या कारनाम्यांबद्दल काहीच माहिती नव्हती. नेहा वेगवेगळ्या बहाण्याने घर सोडून जायची आणि लग्न करायची. यानंतर, संधी मिळताच ती मुलाच्या घरातून पळून जायची. कधी ती मित्रांच्या लग्नाला जात असल्याचं आईला सांगायची, तर कधी मैत्रिणींसोबत फिरायला जात असल्याचं कारण द्यायची.

बाराव्या सासरी महिनाभर अडकली

नेहाने सुमारे एक महिन्यापूर्वी जयरामशी लग्न केले होते. पण यावेळी नेहा नवरदेवाच्या घरात अडकली आणि महिनाभर तिला घरातून पळून जाण्याची संधी मिळाली नाही. जेव्हा नेहा तिच्या घरी परतली तेव्हा आईने तिचा ठिकाणा काय होता, अशी विचारणा केली. तेव्हा तिने सांगितले की तिचे अपहरण झाले होते आणि संधी मिळताच ती पळून आली.

बिहारमध्ये तरुणीने एक्स बॉयफ्रेण्डला लुटले

दुसरीकडे, दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलेल्या तरुणीनेच तिच्या साथीदारांच्या मदतीने पूर्वाश्रमीच्या प्रियकराला लुटल्याची धक्कादायक घटना नुकतीच बिहारमध्ये समोर आली आहे. फिरायला जाण्याच्या बहाण्याने ती तरुणाला गंगेच्या घाटावर घेऊन गेली होती. तिथे तरुणी आणि तिच्या साथीदारांनी तरुणाला कारमध्ये बसवून शस्त्राच्या बळावर दागिने आणि मोबाईल फोन लुटला. तसेच त्याच्या बँक खात्यातील अडीच लाख रुपयांची रक्कमही दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केली. त्यानंतर धमकी देऊन आरोपींनी युवकाला सोडून दिले. पीडित सनी दीपक उर्फ ​​कबीर याने पीरबाहोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर बाबी नावाच्या मुलीला पोलिसांनी अटक केली असून तिच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.

संबंधित बातम्या :

कोर्ट मॅरेज केलं, कुटुंबापासून लपवलं, दोनच महिन्यात नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून संपवलं

दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीप, एक्स बॉयफ्रेण्डला पुन्हा भेटायला बोलावलं आणि…

बहिणींना माझं तोंडही दाखवू नका, प्रेयसीला अंत्यसंस्काराला बोलावू नका, सुसाईड नोट लिहित जिम प्रशिक्षकाचा गळफास

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.