जयपूर : विद्यार्थ्याने गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे राजस्थानच्या चुरु जिल्ह्यात एका शिक्षकातील सैतान जागा झाला. संतापाच्या भरात शिक्षकाने मुलाला इतकं बदडलं, की त्याचा मृत्यू झाला. सातवीच्या विद्यार्थ्याने होमवर्क पूर्ण न केल्याबद्दल एका खासगी शाळेतील शिक्षक संतापला होता. आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारने शाळेवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंद दोतसरा यांनी शाळेची मान्यता स्थगित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. सालासर पोलीस ठाण्याचे एसएचओ संदीप बिष्णोई यांनी सांगितले की, 13 वर्षीय विद्यार्थी हा एका खासगी शाळेत इयत्ता सातवीचा विद्यार्थी होता. गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल शिक्षकेने त्याला बेदम मारहाण केली .
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलाला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की आरोपी शिक्षक मनोज (35 वर्ष) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेवर कारवाई
शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा म्हणाले की, कोळसर गावात एका इयत्ता सातवीच्या मुलाचा खासगी शाळेतील शिक्षकाला मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याची दुःखद बातमी आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत शाळेची मान्यता स्थगित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे डोटासरा यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
VIDEO | पाणी पिण्यासाठी थांबलेल्या महिलेच्या दुचाकीवर कारवाई, पुणे ट्रॅफिक पोलिसांचा अजब कारभार
पोलीस महासंचालक पदक विजेता सहाय्यक फौजदार ACB च्या जाळ्यात, 40 हजारांची लाच घेतल्याचा आरोप