पहिली बायको सोडून गेली, दुसरीचा गळा दाबून खून, लग्नानंतर साडेचार महिन्यांतच असं काय घडलं?

मयत महिलेच्या वडिलांनी सांगितले की त्यांची मुलगी कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू शकत नाही. सासरच्या लोकांनी खून करून तिचा मृतदेह लटकवला आहे. पोलिसांनी तपास केला असता सत्य बाहेर आले. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अवघ्या 12 तासांत आरोपी पतीला अटक केली.

पहिली बायको सोडून गेली, दुसरीचा गळा दाबून खून, लग्नानंतर साडेचार महिन्यांतच असं काय घडलं?
कूचबिहारमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा रहस्यमयरित्या मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 2:41 PM

जयपूर : पतीने लग्नानंतर अवघ्या साडेचार महिन्यांतच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील कोटा शहरातील इटावा पोलीस स्टेशन परिसरात उघडकीस आली आहे. बायकोची हत्या ही आत्महत्या वाटावी, यासाठी पतीने तिचा मृतदेह फासावर लटकवला होता. मात्र घटनास्थळावरील पुरावे आणि मयत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी उपस्थित केलेल्या शंकेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता हा खून असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावरही संशय असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मयत महिला ही त्याची दुसरी पत्नी असल्याचं उघड झालं असून पतीच्या जाचाला कंटाळून त्याची पहिली पत्नीही सोडून गेली होती, असा दावा केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इटावा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खतोली भागातील भैरुपुरा येथील रहिवासी असलेले मयत महिलेचे वडील रामचरण मीना यांनी 17 नोव्हेंबर रोजी इटावा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी पिस्ताबाई हिचे इटावा येथील सरोवर नगर येथील रहिवासी कुलदीप मीनासोबत 2 जुलै रोजी लग्न झाले होते. कुलदीप मीनाने पिस्ताबाईला तीन महिने व्यवस्थित सांभाळेले आणि तिला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही.

बायकोने आत्महत्या केल्याचा नवऱ्याचा दावा

दारु आणि गांजाच्या आहारी गेल्यानंतर कुलदीपने पत्नी पिस्ताबाईला मारहाण करून हुंडा आणि पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. मंगळवारी रात्री 12:40 वाजता जावई कुलदीपचा फोन आला की, तुमच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या माहितीवरून ते घटनास्थळी पोहोचले. मी तिथे पाहिलं तर पिस्ताबाई फासावर लटकली होती, पण तिचे पाय बेडवरच टेकले होते.

अवघ्या 12 तासांत आरोपी पतीला अटक

मयत महिलेच्या वडिलांनी सांगितले की त्यांची मुलगी पूर्णपणे निरोगी आणि सुशिक्षित होती. एवढेच नाही तर ती कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू शकत नाही. सासरच्या लोकांनी खून करून तिचा मृतदेह लटकवला आहे. पोलिसांनी तपास केला असता सत्य बाहेर आले. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अवघ्या 12 तासांत आरोपी पती कुलदीपला अटक केली.

पहिली पत्नी सोडून गेली

कुलदीप हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेत असे, असेही तपासात समोर आले आहे. यामुळे त्याने आधी पिस्ताबाईचा गळा आवळून खून केला आणि नंतर मृतदेह लटकवला. आरोपी कुलदीपची पहिली पत्नीही त्याच्यावर नाराज होती. यामुळे ती नाराज होऊन त्याच्यापासून वेगळी झाली. पिस्ताबाई ही कुलदीपची दुसरी पत्नी होती. 2 जुलै रोजी कुलदीपचा पिस्ताबाईसोबत विवाह झाला होता.

संबंधित बातम्या :

लग्नाची तारीख ठरली, मॉडेलवर बलात्कार, पीडिता गरोदर होताच नवरदेव पळाला

अवघ्या 400 रुपयांवरुन वाद, तरुणाला भोसकलं, अल्पवयीन तरुणासह पाच जण गजाआड

फेसबुकवरील मैत्री महागात, नगरमध्ये सरकारी कर्मचाऱ्याची 2 लाख 30 हजारांना फसवणूक

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.