14 वर्षांच्या चुलत भावासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं, दहा वर्षांच्या चिमुरड्याची हत्या

राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी 24 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून एका 14 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

14 वर्षांच्या चुलत भावासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं, दहा वर्षांच्या चिमुरड्याची हत्या
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 7:44 AM

जैसलमेर : नातेसंबंधांची अक्षरशः चिरफाड करणारी धक्कादायक घटना राजस्थानमध्ये समोर आली आहे. 24 वर्षांच्या महिलेने आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या (Son Murder) केली. या चिमुरड्याचा दोष इतकाच की त्याने आपल्या आईची थेरं उघड्या डोळ्यांनी पाहिली. 24 वर्षांच्या महिलेचे 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affair) होते. दोघेही एकमेकांचे नातेवाईक होते. महिलेच्या दहा वर्षांच्या मुलाने दोघा जणांना नको त्या अवस्थेत रंगेहाथ पाहिले. चुलत भाऊ आणि आई यांना अनैतिक संबंध ठेवताना पाहून बालक अवाक झाला. मुलगा आपल्या विषयी नवऱ्याला आणि कुटुंबीयांना सांगेल, ही भीती विवाहितेच्या मनात दाटून आली. त्यामुळे घाबरुन तिने सख्ख्या मुलाचीच हत्या केल्याचा आरोप आहे. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये (Jaisalmer Rajasthan) हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे.

काय आहे प्रकरण?

राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी 24 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून एका 14 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. महिलेच्या 10 वर्षांच्या मुलाने 9 फेब्रुवारी रोजी त्याची आई आणि त्याच्या 14 वर्षांच्या चुलत भावाला नको त्या अवस्थेत पाहिले होते, असे पोलिसांनी सांगितले.

बोभाटा होण्याच्या भीतीने हत्या

आपला मुलगा त्याच्या वडिलांसह घरातील इतर सदस्यांना आपल्या अनैतिक संबंधांविषयी सांगेल, या भीतीने महिलेने आणि अल्पवयीन मुलाने दहा वर्षांच्या बालकाचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह शेजारच्या विहिरीत टाकला, असेही पोलिसांनी सांगितले. 10 फेब्रुवारीला सकाळी त्याचा मृतदेह सापडला.

महिलेला अटक, पुतण्या ताब्यात

संशयाच्या आधारे पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीच्या पुतण्याला ताब्यात घेतले. जैसलमेरच्या सर्कल ऑफिसर प्रियंका यादव यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान, या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. महिलेच्या मुलाने दोघांनाही शारीरिक संबंध ठेवताना पाहिले होते, त्यानंतर त्यांनी मुलाची हत्या केली, असेही तपासात उघड झाले. महिलेला अटक करण्यात आली आहे, तर अल्पवयीन मुलाला हत्ये प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

अनैतिक संबंधांचा संशय, बाईकवर बसवून मनमाड रोडवर नेलं, तरुणाकडून मेव्हण्याची हत्या

घरमालकिणीचा अनैतिक संबंधांना नकार, पुण्यात भाडेकरुकडून 30 वर्षीय विवाहितेची हत्या, बाथरुममध्ये मृतदेह आढळला

मेहुणीला लग्नाचं वचन, बायकोचा मर्डर, महिला पोलिसांशी अनैतिक संबंध, स्त्रीलंपट नवऱ्याला अटक

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.