बायकोने अबोला धरल्यामुळे खट्टू, पोलीस कॉन्स्टेबल पतीची विष पिऊन आत्महत्या
पोलीस हवालदार हनुमान सिंग यांनी रविवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. करवा चौथच्या निमित्ताने पत्नी रागवल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे.
जयपूर : राजस्थानच्या झालावाड शहरात एका पोलीस कॉन्स्टेबलने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. करवा चौथच्या मुहूर्तावर त्याच्या पत्नीने अबोला धरला होता, याच कारणावरुन त्याने आयुष्य संपवल्याची चर्चा आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी हवालदाराला झालावाड येथील रुग्णालयात नेले, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
उत्तर भारतीय समाजात करवा चौथच्या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास ठेवते. चंद्रोदयानंतर पतीचे दर्शन घेऊन पत्नी उपवास सोडते. मात्र याच दिवशी राजस्थानमधील संबंधित पती-पत्नीत अबोला आला. त्यानंतर पतीने आयुष्य संपवलं.
काय आहे प्रकरण?
झालावाड शहरातील इंदिरा कॉलनीत राहणारे पोलीस हवालदार हनुमान सिंग यांनी रविवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. करवा चौथच्या निमित्ताने पत्नी रागवल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस दल मयत हवालदाराच्या घरी पोहोचले. हनुमान सिंह यांचा मृतदेह एसआरजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या शवागारात आणण्यात आला, तिथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.
निलंबित पोलीस कॉन्स्टेबल
झालरापाटनचे एसएचओ जितेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले की, आत्महत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. मृत पोलीस हवालदार हनुमान सिंग हे बऱ्याच दिवसांपासून मुलीला पळवून नेण्याच्या प्रकरणात निलंबित होते.
संबंधित बातम्या :
थुंकताना पाय घसरला, ग्रीलमध्ये गळा अडकून नवऱ्याचा मृत्यू, बायको घराबाहेर येईपर्यंत होत्याचं नव्हतं!
खजिन्याच्या लालसेतून बायकोचा बळी, नऊ महिन्यांनी डॉक्टर पती पोलिसांच्या जाळ्यात