लग्नाच्या आमिषाने कॉन्स्टेबलचा तरुणीवर बलात्कार, गरोदर राहिल्याने अघोरी कृत्य

कॉन्स्टेबल सावन कुमार हा पीडित तरुणीच्या संपर्कात आला. पीडितेचा आरोप आहे की, सावन कुमार तिला 2015 मध्ये निवाई येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. तिथे कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून त्याने तिच्यावर बलात्कार केला.

लग्नाच्या आमिषाने कॉन्स्टेबलचा तरुणीवर बलात्कार, गरोदर राहिल्याने अघोरी कृत्य
संग्रहित फोटो
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 9:56 AM

जयपूर : राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. नुकतंच एका तरुणीवर बलात्कार (Rajasthan Rape Case) झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा राजस्थान पोलिस हवालदार (Police Constable) आहे. कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून आरोपी कॉन्स्टेबलने तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर कॉन्स्टेबलने तिचा गर्भपात केला. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने तो तरुणीचे वारंवार शोषण करत राहिला. कॉन्स्टेबलने लग्नाचे आश्वासन न पाळल्याने अखेर तरुणीने कंटाळून पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी कॉन्स्टेबलवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. धक्कादायक म्हणजे पहिल्या बायकोपासून घटस्फोटाचा खटला अजूनही कोर्टात सुरु आहे. त्याआधीच त्याने दुसऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी पोलीस हवालदार सावन कुमार हा जयपूर आयुक्तालयात तैनात आहे. 11 वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. लग्नाच्या चार वर्षानंतरच त्याचा पत्नीशी वाद झाला. तेव्हापासून, म्हणजेच गेल्या सात वर्षांपासून तो तिच्यापासून वेगळा राहत होता. पत्नीपासून घटस्फोटासाठी न्यायालयात खटला सुरू आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आरोपी हवालदार दूनी येथील पोल्याडा येथील रहिवासी आहे.

हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार

दरम्यानच्या काळात कॉन्स्टेबल सावन कुमार हा पीडित तरुणीच्या संपर्कात आला. पीडितेचा आरोप आहे की, सावन कुमार तिला 2015 मध्ये निवाई येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. तिथे कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून त्याने तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान त्याने तिचे काही अश्लील फोटोही काढले. बलात्कार पीडित तरुणी गरोदर राहिली. त्यावर आरोपीने तिचा गर्भपात करून घेतला. त्यानंतर लग्नाच्या आमिषाने तो तिचे शोषण करत राहिला.

लग्नाच्या वचनापासून फारकत

लग्नाच्या बहाण्याने आरोपीने सलग चार वर्षे तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. यादरम्यान आरोपीने तिला टोंक, निवाई आणि जयपूर येथे नेऊन तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. दोन वर्षांनंतर तिने लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली, त्यानंतर सावनने नातेसंबंध तोडण्यास सुरुवात केली. त्याच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही आरोपी तिच्यापासून दुरावा राखत होता. यामुळे नाराज होऊन तिने निवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

राजस्थान पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप होण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. याआधीही डीएसपी हिरालाल सैनी आणि एका महिला कॉन्स्टेबलचे प्रकरण सर्वाधिक चर्चेत होते. या दोघांचा स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतानाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या :

अकरावीतील विद्यार्थिनीला हॉटेलवर बोलावलं, गुंगीचं औषध पाजून 22 वर्षीय तरुणाकडून बलात्कार

पतीच्या बर्थडेनिमित्त हॉटेलात जेवायला, पुण्यात विवाहितेवर पाच जणांचा गँगरेप

प्रियकराने प्रेयसीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या; तिची मात्र पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.