VIDEO | गृहपाठ न करता खेळायला गेला, बापाने आठ वर्षांच्या मुलाला हातपाय बांधून छताला उलटं टांगलं
पुष्कर प्रजापत या खाण कामगाराने इयत्ता पाचवीचा विद्यार्थी असलेल्या पोटच्या मुलासोबत हे भयावह कृत्य केल्याचा आरोप आहे. गृहपाठ पूर्ण केला नसताना घराबाहेर खेळताना दिसल्याने त्याला कठोर शिक्षा दिल्याचं आरोपी बाप म्हणाला.
कोटा : 35 वर्षीय बापाने आपल्या आठ वर्षांच्या मुलाचे हातपाय बांधून त्याला छतावर उलटे टांगल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गृहपाठ न करता खेळायला बाहेर गेल्याबद्दल त्याला निर्दयीपणे मारहाण करत ही अघोरी शिक्षा दिल्याचा आरोप आहे. राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल घेतली. राजस्थान राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने जिल्हा अधीक्षकांना या प्रकरणात कारवाई करण्यास सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना बुंदी जिल्ह्यातील डाबी पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या नरोली गावात गेल्या बुधवारी घडली. मुलाची आई आपल्या पतीला क्रूर वागणूक देण्यापासून रोखू शकली नाही. त्यामुळे या कृत्याचा व्हिडिओ शूट करुन तो व्हायरल करत तिने ही घटना उघडकीस आणली.
गृहपाठ न करता खेळाला गेल्याचा राग
पुष्कर प्रजापत या खाण कामगाराने इयत्ता पाचवीचा विद्यार्थी असलेल्या पोटच्या मुलासोबत हे भयावह कृत्य केल्याचा आरोप आहे. गृहपाठ पूर्ण केला नसताना घराबाहेर खेळताना दिसल्याने त्याला कठोर शिक्षा दिल्याचं आरोपी बाप म्हणाला.
आईने व्हिडीओ शूट करुन भावाला दिला
विशेष म्हणजे मुलाच्या आईलाही आरोपीकडून अशाच प्रकारची क्रूर वागणूक मिळत असे. अवनल्हेडा गावातील रहिवासी असलेला तिचा भाऊ चंद्रभान प्रजापत याला हा व्हिडीओ पाठवल्यानंतर त्याने तो चित्तोड जिल्ह्यातील बेगुन पोलीस स्टेशनला दिला होता. मात्र हद्दीचा मुद्दा पुढे करत पोलिसांनी कारवाईस टाळाटाळ केली. अखेर चंद्रभानने तो बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला.
डाबी पोलिस स्टेशनचे अधिकारी महेश कुमार मुलाच्या गावी गेले होते परंतु त्यांना त्याचे घर बंद असल्याचे आढळले. मुलाच्या आईची तक्रार नसल्याने ते एफआयआर दाखल करू शकले नाहीत.
पाहा व्हिडीओ :
If homework was not done in Chittorgarh Rajasthan the father tied the son’s hands and feet and threw him on the ground The son kept pleading still the heart did not sweat @RajPoliceHelp File a case under Domestic Violence Act@DrBDKallaINC@ashokgehlot51 pic.twitter.com/m98gXSPerc
— Sunita Kumari 60k (@ISunitaKumari) November 24, 2021
संबंधित बातम्या :
नगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या, धक्क्यातून अल्पवयीन प्रियकराचाही शेतात गळफास
आधी आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार, वेदनेने रडत होती म्हणून गळा दाबला, वाचा नेमकं काय घडले?