Crime News : क्रौर्याचा कळस, 23 वर्षाच्या युवकाच मुंडक उडवलं, त्यानंतर आरोपीने जे केलं ते धक्कादायक
Crime News : काळाजाचा थरकाप उडवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. हा गुन्हा ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला, त्यांची काय अवस्था झाली असेल? याचा विचार करुनही अंगावर काटा येतो.
जयपूर : समाजात गुन्हे सतत घडत असतात. काही गुन्ह्यांची माहिती घेतल्यानंतर, त्या बद्दल वाचल्यानंतर माणसात इतकी क्रूरता कुठून येते? असा प्रश्न पडतो. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात अशीच काळाजाचा थरकाप उडवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. हा गुन्हा ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला, त्यांची काय अवस्था झाली असेल? याचा विचार करुनही अंगावर काटा येतो. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात अशी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
जालोर जिल्ह्याच्या अहोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पादारदी गावात हा भयनाक गुन्हा घडला. एका 50 वर्षीय आरोपीने 23 वर्षीय युवकाचा शिरच्छेद केला.
इंटरनेट सेवा बंद
आरोपीने हत्या केल्यानंतर त्याने युवकाच कापलेलं मुंडक हातात घेतलं. हे मुंडक घेऊन तो फिरत होता. नंतर त्याने कापलेलं मुंडक रस्त्यावर फेकून दिलं, असं पोलिसांनी सांगितलं. या घटनेनंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात इंटरनेट सेवा बंद आहे. पोलिसांनी शंकला राम भील या आरोपीला अटक केली. त्याने हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड जप्त केली आहे.
का हत्या केली?
शंकला राम भील आणि मृत युवक किशोर सिंह यांच्यात आधीपासून वाद होते, असं पोलिसांनी सांगितलं. या हत्येनंतर गावकऱ्यांनी आंदोलन केलं व आरोपीच्या संपूर्ण कुटुंबाला अटक करण्याची मागणी केली. ही हत्या पूर्वनियोजित नव्हती. आरोपी किशोर सिंह नशेत नेहमी आरोपीच्या कुटुंबाला शिवीगाळ करायचा, असं पोलिसांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
शिरच्छेद होईपर्यंत वार
बुधवारी संध्याकाळी किशोर सिंह गावातील बस स्टँडच्या दिशेने चालला असताना त्याची हत्या झाली. “आरोपी शंकला राम भीलच्या घराजवळ मंदिर आहे. मंदिराबाहेर बाईकवर त्याने आपली कुऱ्हाड ठेवली होता. किशोर सिंह तिथे येताच शंकला राम भीलने त्याच्या मानेवर कुऱ्हाडीचे तीन घाव घातले. शिरच्छेद होईपर्यंत त्याने वार केले” असं जालोरचे एसपी किरण कांग यांनी सांगितलं. शीर रस्त्यावर टाकून पळाला
इतक्या क्रूर पद्धतीने हत्या केल्यानंतर आरोपी शंकला राम भीलने किशोर सिंहच मुंडकं हातात घेतलं व गावकऱ्यांना तो दाखवत होता. त्यानंतर त्याने शीर रस्त्यावर टाकलं व तिथून पळून गेला. राजस्थान पोलिसांनी गुरुवारी आरोपीला अटक केली व त्याची चौकशी सुरु आहे. किशोर सिंह सतत मला व माझ्या कुटुंबियांना टोचून बोलायचा, शिवीगाळ करायचा, असं आरोपीने पोलीस चौकशीत सांगितलं.