Jodhpur Car Accident | भरधाव कारने आठ जणांना चिरडलं, अंगाचा थरकाप उडवणारा अपघात
जोधपूरमध्ये अतिशय थरारक आणि अंगाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. एका महागड्या कारने तब्बल नऊ जणांना चिरडले आहे. गाडी भरधाव वेगात असल्यामुळे यातील एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राजस्थान : जोधपूरमध्ये अतिशय थरारक आणि अंगाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. एका महागड्या कारने तब्बल नऊ जणांना चिरडले आहे. गाडी भरधाव वेगात असल्यामुळे यातील एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ही घटना घडली. जोधपूरमधील AIIMS रोडवर काही प्रवासी दुचाकीवर तसेच पायी जात होते. या रस्त्याच्या बाजूला काही झोपड्यादेखील आहेत. यावेळी मागून अचानकपणे एक महागडी कार भरधाव वेगात आली. अचानकपणे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. परिणामी कारने तब्बल नऊ जणांना चिरडले. परिणामी यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले.
जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार
या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये भरधाव वेगात कार आल्याचे दिसत आहे. जखमी प्रवाशांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृताचे नाव मुकेश असून तो तीस वर्षांचा होता. जखमी झालेल्यांपैकी तीन जण झोपडीमधील रहिवाशी आहेत तर चार जण प्रवासी आहेत.
पाहा व्हिडीओ :
Uncontrolled Audi Car hit bikes, people on Pal Road in #Jodhpur, #Rajasthan. 16 year old killed, 10 injured. 50 year old owner and driver of #Jaipur registered car Amit Nagar appeared in Shastri Nagar Police station after the #accident. Horrible Live CCTV #Video: Graphic Content pic.twitter.com/T8Zgc2mXWq
— Madhaw Tiwari (@MadhawTiwari) November 10, 2021
मृताच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत
या घटनेची माहिती होताच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एम्स रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जखमी प्रवाशांची चौकशी केली. तसेच योग्य तो उपचार करण्याचे डॉक्टरांना निर्देश दिले. गेहलोत यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना एक लाख तर किरकोळ जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान बेफाम होऊन कार चालवणाऱ्या आरोपीचे नाव अमित नगर असून त्याला पोलिसांनी अटक केलीय. त्याची पुढील चौकशी केली जात आहे.
इतर बातम्या :
Maharashtra MLC Election 2021: विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी लवकरच निवडणूक, मतदान, मतमोजणी कधी ?
TV9 च्या Dare2Dream अवॉर्ड्स सीझन 3 सोबत यश सेलिब्रेट करण्याची संधी, कसे सहभागी व्हाल?
(rajasthan jodhpur speeding car rammed one died eight injured accident video went viral on social media)