ज्याला आजोबा मानायची, त्या 68 वर्षीय वृद्धाकडूनच 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

संबंधित 14 वर्षीय बालिका तिच्या शेजारी राहणाऱ्या वृद्धाला "आजोबा" अशी हाक मारायची. त्याच्या नातवंडांसोबतही ती खेळायची. पीडितेच्या वडिलांसोबत आरोपी वृद्धाचं त्यांच्या घरी येणं-जाणं असायचं.

ज्याला आजोबा मानायची, त्या 68 वर्षीय वृद्धाकडूनच 14 वर्षीय मुलीवर बलात्कार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 9:44 AM

जयपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शेजारच्या वृद्धावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 14 वर्षीय बालिका ज्याला “आजोबा” अशी हाक मारायची त्या 68 वर्षीय नराधमानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या आरोपांनंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. राजस्थानमधील जोधपुरात ही घटना उघडकीस आली असून आरोपी वृद्ध पसार झाला आहे. (Rajasthan Old Man allegedly Rapes neighbor minor girl)

शेजारी राहणारा वृद्ध “आजोबां”समान

राजस्थानमधील जोधपूरमध्ये ओसिया पोलिस ठाण्याअंतर्गत एका गावात ही घटना घडली. संबंधित 14 वर्षीय बालिका तिच्या शेजारी राहणाऱ्या वृद्धाला “आजोबा” अशी हाक मारायची. त्याच्या नातवंडांसोबतही ती खेळायची. पीडितेच्या वडिलांसोबत आरोपी वृद्धाचं त्यांच्या घरी येणं-जाणं असायचं. पीडितेचे वडील वॉचमनची नोकरी करायचे. तर तिला आई नसल्यामुळे वडिलांच्या अनुपस्थितीत ती घरी एकटीच असायची.

बलात्कारानंतर जीवे मारण्याची धमकी

घटनेच्या दिवशी पीडितेचे वडील ड्युटीवर गेले होते. घरात एकटी असल्याची संधी साधत आरोपी वृद्ध तिच्या मागोमाग घरी शिरला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. कोणाला सांगितल्यास गळा दाबून जीवे मारण्याची धमकीही त्याने पीडितेला दिली होती. त्यामुळे अनेक दिवस ती गप्प राहिली. मात्र अखेर तिने वडिलांसमोर आपल्यावरील अत्याचाराचा पाढा वाचला.

वृद्ध पसार, पोलिसांकडून शोध सुरु

पीडितेने पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर वृद्ध फरार झाला असून पोलीस त्याच्या अटकेसाठी अनेक ठिकाणी छापेमारी करत आहेत.

नागपुरातही शेजारी वृद्धाकडून अत्याचार

दरम्यान, याआधीही 55 वर्षीय व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. दोन्ही मुली त्याला आजोबा म्हणून हाक मारायच्या. ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून आरोपीने त्यांना घरी बोलावलं होतं. मुलींच्या तोंडावर आणि डोळ्यांवर कापड बांधून त्याने अत्याचार केल्याचं समोर आलं होतं. नागपूरच्या कळमना पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

संबंधित बातम्या :

शेजारच्या आजोबांनी ल्युडो खेळायचं आमिष दाखवलं, नंतर किळसवाणं कृत्य, अल्पवयीन मुलींसोबत संतापजनक प्रकार

ताईच्या बाळंतपणासाठी गेलेल्या 21 वर्षीय बहिणीवर बलात्कार, भावजींवर गुन्हा

(Rajasthan Old Man allegedly Rapes neighbor minor girl)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.