पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर चोरीची घटना, तडीपार चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडले !

पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी मोबाईलच्या दुकानावर डल्ला मारला. लाखोंचे मोबाईल घेऊन चोरटे पसार झाला. पोलीस आपल्यापर्यंत कधीच पोहचू शकत नाहीत, असा चोरट्यांचा समज होता.

पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर चोरीची घटना, तडीपार चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडले !
डोंबिवलीत दुकानाचे शटर तोडून मोबाईल चोरणारे चोरटे अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 5:38 PM

डोंबिवली / सुनील जाधव : डोंबिवली पूर्वेकडील पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच एका मोबाईलच्या दुकानात चोरीची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. मोबाईलच्या दुकानाचे शटर उचकटून दोन चोरट्यांनी महागडे 33 मोबाईल चोरुन पळ काढला होता. रामनगर पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही चोरीची घटना घडली होती. मात्र दोन दिवसात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे दोन्ही चोर अट्टल गुन्हेगार असून, एक चोरटा तडीपार आणि दुसरा फरार आरोपी आहे. फिरोज उर्फ बटला उर्फ राहुल खान आणि सागर पारखे अशी या आरोपीची नावे आहेत.

दुकानाचे शटर उचकटून लाखो रुपयांचे मोबाईल चोरले

डोंबिवली पूर्वेकडील रामनगर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेले प्रिया मोबाईल दुकानाचे शटर उचकटून लाखो रुपये किमतीचे मोबाईल चोरी केल्याची घटना 14 एप्रिल रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक पुरावाच्या आधारे आरोपींचा कसोशीने शोध सुरु केला. आरोपींबाबत कोणताही मागमूस नसताना सदर गुन्ह्यातील आरोपी फिरोज उर्फ बटला उर्फ मुन्ना खान आणि सागर शाम पारखे यांना 12 तासाच्या आत अटक करत गुन्ह्य उघडकीस आणला.

आरोपींकडून अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत

आरोपींपैकी 4 लाख 7 हजार रुपये किमतीच्या मोबाईल पैकी एकूण 2 लाख 37 हजार रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट हस्तगत केले आहेत. हे सदर आरोपी मुंबई येथील अट्टल गुन्हेगार असून त्यांचे विरुद्ध मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यामध्ये घरफोडी, चोरी, मारहाणीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास डोंबिवली रामनगर पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.