Pune : 20 रुपयांचे आमिष दाखवून 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना, आरोपीला बेड्या

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शेजारी राहणाऱ्या एका नराधम तरुणाने 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची ही घटना आहे. या तरुणाने अल्पवयीन मुलाला 20 रुपयांचे आमिष दाखवले आणि तिच्यावर आत्याचार केले. नातेवाईकांच्या तक्रारीवरुन आरोपीला अटक करण्यात आलीय.

Pune : 20 रुपयांचे आमिष दाखवून 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना, आरोपीला बेड्या
सांकेतिक फोटो Image Credit source: social
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 9:11 AM

पुणे : शहरातून एक धक्कादायक (Rape incident in Pune) घटना समोर आलीय. शेजारी राहणाऱ्या एका नराधम तरुणाने 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर (11 year old Girl rape) बलात्कार केल्याची ही घटना आहे. या तरुणाने अल्पवयीन मुलाला 20 रुपयांचे (Rupees) आमिष दाखवले आणि तिच्यावर आत्याचार केले. नातेवाईकांच्या तक्रारीवरुन आरोपीला अटक करण्यात आलीय. बलात्कार करणारा तरुण अल्पवयी मुलीच्या शेजारी राहत होता. यावेळी आरोपीने मुलीला 20 रुपयांचे आमिष दाखवले. यानंतर त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही माहिती आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत तरुणावर गुन्हा दाखल केला असून आरोपीला गजाआड केलं आहे. आता या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. आरोपीने यापूर्वी देखील मुलीवर अनेकदा अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगतिले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांकडून घेण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नेमकी घटना काय?

पुण्यात एका 11 वर्षीय मुलीवर मयूर पांडुरंग फडक या तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पीडितेच्या घराजवळ राहतो. घरात कोणीही नसल्याची संधी सांधून तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर या मुलीला 20 रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तरुणी चांगलीच घाबरली असून तिचं सातत्यानं समुपदेश केलं जातंय.

मुलीच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप

या घटनेत मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीवर गंभीर आरोप केले आहेत. आरोपीने अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पोटात अचानक दुखू लागले. यानंतर तिने सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर ही घटना उघडकीस आली. मुलीच्या कुटुंबियांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलीस ठाण्यात दिली. यानंतर अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं. आता याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यातत आला आहे.

बलात्कारानंतर मुलीला धमकी

मयूर पांडुरंग फडक या तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन मुलाल धमकी दिली. हा प्रकार कुणालाही सांगितल्यास जिवे मारेल, असं या तरुणाने अल्पवयीन मुलीला धमकावलं. मात्र, मुलीच्या पोटात दुखू लागल्याने हा संपूर्ण प्रकार समोल आलाय. मुलीच्या नातेवाईकांच्या सांगण्यानुसार यापूर्वी आरोपीने मुलीवर अनेकदा अत्याचार केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून याप्रकरणी सखोल चौकशी केली जातेय. पुणे पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.

इतर बातम्या

मुंबईकरांनो, लहान मुलांना घेऊन फिरायला जाण्याचा प्लॅन करताय?, तर मग ‘या’ ठिकाणांना भेट द्याच!

Chanakya Niti : विद्यार्थ्यांनो…आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले हे मंत्र लक्षात ठेवा आणि आपली ध्येय साध्य करा!

शिवसेनेची मोर्चेबांधणी, CM Uddhav Thackeray खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी आज संवाद साधणार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.