धक्कादायक… छत्तीसगडमध्ये नववीतील विद्यार्थिनीवर 13 दिवस आठ जणांकडून सामूहिक बलात्कार

या तरुणाने बलात्कार केल्यानंतर या मुलीला सोडून न देता आपल्या मित्रांच्या ताब्यात दिले. | Rape on minor girl

धक्कादायक... छत्तीसगडमध्ये नववीतील विद्यार्थिनीवर 13 दिवस आठ जणांकडून सामूहिक बलात्कार
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 12:11 PM

रायपूर: छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्यात नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर आठ जणांकडून सामूहिक बलात्कार (Rape) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल 13 दिवस या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांना अटक केली असून त्यापैकी सहाजण अल्पवयीन असल्याचीही धक्कादायक माहितीही समोर आली आहे. (Rape on minor girl in Chhattisgarh)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी 20 नोव्हेंबरला मैत्रिणींना भेटायला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर गांधीनगर परिसरात ती मैत्रिणीसोबत आलेल्या एका तरुणाला भेटली. या तरुणाने पीडित मुलीला आपल्यासोबत येण्यास राजी केले. त्यानंतर तरुणाने या मुलीवर बलात्कार केला.

या तरुणाने बलात्कार केल्यानंतर या मुलीला सोडून न देता आपल्या मित्रांच्या ताब्यात दिले. त्यानंतर 13 दिवस या मुलीवर सात वेगवेगळ्या जणांकडून बलात्कार करण्यात आला.

तर दुसरीकडे या मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या घरातील लोक चिंतेत पडले होते. त्यांनी 20 नोव्हेंबरला राजापूर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीच्या तपासाला सुरुवात केली. या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती.

अखेर एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्याआधारे पोलिसांनी 5 डिसेंबरला अंबिकापुर जिल्ह्यातील सरगुजा येथून पीडित मुलीला हुडकून काढले. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा जबाब नोंदवून घेतला. आपल्यावर 13 दिवसांत आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे मुलीने पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनाही प्रचंड धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरु करत सर्व आरोपांनी ताब्यात घेतले.

राजापूर पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी सहाजण अल्पवयीन आहेत. पोलिसांनी या सर्वांवर गैरकृत्य आणि पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर दोन सज्ञान आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु आहे.

संबंधित बातम्या:

मोबाईलला नेटवर्क नसल्याने घराबाहेर आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, दोन जणांवर गुन्हा

जीवनसाथी डॉट कॉमवरून महिलांची फसवणूक करणाऱ्याला अटक; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

बाप नव्हे सैतान! गुप्तांगावर मेणाचे चटके, अमानुष मारहाण, सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला अटक

(Rape on minor girl in Chhattisgarh)

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.