संतापजनक ! बलात्कार पीडितेची गावकऱ्यांनी आख्ख्या गावात धींड काढली

मध्य प्रदेशच्या आदिवासी पट्ट्यातील अलीराजपूर जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे (rape victim tied up with accused then procession taken out in village in Madhya Pradesh)

संतापजनक ! बलात्कार पीडितेची गावकऱ्यांनी आख्ख्या गावात धींड काढली
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 6:15 PM

भोपाळ : मध्य प्रदेशच्या आदिवासी पट्ट्यातील अलीराजपूर जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अलीराजपूरच्या जोबाट पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने बलात्कार केला. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी संबंधित आरोपीबाबत पोलिसात तक्रार न करता त्याची आणि पीडितेची गावात धींड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे (rape victim tied up with accused then procession taken out in village in Madhya Pradesh).

पीडितेला रस्सीने बांधून गावात धींड काढली

याप्रकरणी पीडितेने पोलिसात तक्रार केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना ही रविवारी (28 मार्च) घडली. गावकऱ्यांनी पीडितेला आणि आरोपीला रस्सीने बांधून गावात त्यांची धींड काढली. विशेष म्हणजे आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याची माहिती समोर आल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला न पकडता पीडितेला मारहाण केली.

पोलिसांची घटनास्थळी धाव

पीडितेच्या नातेवाईकांनी आणि कुटुबियांनी आरोपी आणि पीडितेला रस्सीने बांधून गावात धींड काढली. अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला. अनेकांनी या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. या घटनेचा सूगावा पोलिसांना लागला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला. त्या जबाबाच्या आधारावर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. पोलिसांनी आधी बलात्कार करणाऱ्या आरोपी विरोधात एफआरआय दाखल केलाय. तर दुसरा एफआरआय तिला छळणाऱ्या गावकऱ्यांविरोधात दाखल केला आहे.

आरोपींना बेड्या

या घटनेबाबत जोबटचे पोलीस अधिकारी दिलीप सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. संबंधित घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली (rape victim tied up with accused then procession taken out in village in Madhya Pradesh).

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.