रवी राणा सोमवारी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार, राणांना बेल की जेल?
अटक टाळण्यासाठी आमदार रवी राणा हे आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी (Ravi Rana Bail) अर्ज सादर करणार होते. परंतू आज आमदार रवी राणा यांना जिल्हा सत्र न्यायालयात (Court) पोहोचण्यास पाच मिनिटं उशिर झाल्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करता आला नाही.
स्वप्निल उमप, प्रतिनिधी, अमरावती : अमरावती मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी बडनेराचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर पोलिसांत 307 चा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी आमदार रवी राणा हे आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी (Ravi Rana Bail) अर्ज सादर करणार होते. परंतू आज आमदार रवी राणा यांना जिल्हा सत्र न्यायालयात (Court) पोहोचण्यास पाच मिनिटं उशिर झाल्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करता आला नाही.त्यामुळे आता सोमवारी ते अर्ज करणार आहेत.दरम्यान राणा यांना अटकपूर्व जामीन मिळेल किंवा नाही हे आता सोमवारी कळेल. अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मोठा वाद झाला होता. यावरून रवी राणा आक्रमक झाले होते. या पुतळ्याच्या वादावरून रवी राणा यांनी आयुक्तांवर तिखट शब्दात टिकाही केली होती.
राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी
आज माध्यमांशी बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, लवकरच हे महविकास आघाडी सरकार पडेल, महाराष्ट्र हा पश्चिम बंगालच्या दिशेने जात आहे. महाविकास आघाडी सरकारकडून मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा आरोप त्यांनी केलाय. तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी अशी आमदार रवी राणा यांनी मागणी केली आहे.शाई फेक प्रकरणात रवी यांना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळं रवी राणा हे राज्याबाहेर होते. त्यांनी पटियाला न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळविला. त्यानंतर ते अमरावतीत आले आहेत. त्याआधी रवी राणा दिल्लीत होते.
शाईफेकीचे प्रकरण राणा यांना भोवलं
गेल्या अनेक दिवसांपासून या पुतळ्यावरून वाद पेटला होता. सुरूवातील रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी पालिकेची परवानगी नसताना हा पुतळा बसवला. त्यानंतर पालिकेने हा पुतळा पोलीस बंदोबस्त लावून हटवला. मात्र त्यानंतर रवी राणा यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी महापालिका आणि राज्य सरकावरविरोधात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनात खासदार नवनीत राणाही सहभागी झाल्या होत्या. या पुतळ्याचा वाद राज्यभर गाजल्याचे दिसून आले होते. त्यानंतरच कार्यकर्ते आणि रवी राण आयुक्तांविरोधात आक्रमक झाले होते. शाईफेकीच्या प्रकारानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले आहेत.
मनसेच्या पदाधिकाऱ्याला भाजपची मारहाण, अटकेसाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा धडकला