एसबीआयची शाखा उघडली, कोणाकडून दोन तर कोणाकडून तीन लाख घेत अनेकांना नोकरी दिली…शेवटी प्रकरण वेगळेच निघाले

Crime News: मनोज अग्रवाल या व्यक्तीने किस्योस्क शाखा उघडण्यासाठी बँकेत पोहचला. त्याने अर्ज भरला. त्याला बँकेच्या शाखेसंदर्भात संशय आहे. त्याने तपास सुरु केला असता ही शाखा बनावट असल्याचे उघड स्पष्ट झाले.

एसबीआयची शाखा उघडली, कोणाकडून दोन तर कोणाकडून तीन लाख घेत अनेकांना नोकरी दिली...शेवटी प्रकरण वेगळेच निघाले
ठगांनी उघडली नकली बँक
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 3:18 PM

अनेक युवक, युवतींना सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. मग ती नोकरी मिळवण्यासाठी कठोर मेहनत करण्याऐवजी एजंटचा साह्य घेतले जाते. त्यातून युवक, युवतींची लाखो रुपयांमध्ये फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहे. परंतु आता तीन भामट्यांनी भारतीय स्टेट बँकेची बनावट शाखा उघडली. त्यात कोणाकडून दोन लाख, कोणाकडून तीन लाख तर कोणाकडून पाच लाख रुपये घेत त्यांना नोकरी दिली. त्यांचे प्रशिक्षण सुरु केले. परंतु हा प्रकार उघड होतात सर्वांनी पळ काढला. छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील छपोरा गावात घडली. या प्रकरणी रेखा साहू आणि मनधीर दास यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडला प्रकार

छपोरामध्ये भारतीय स्टेट बँकेची शाखा उघडली गेली. या शाखेत भरती सुरु झाली. त्या शाखेत संगीता कवर यांच्याकडून 2.50 लाख रुपये, लक्ष्मी यादव यांच्याकडून 2 लाख रुपये, पिंटू मरावी यांच्याकडून 5.80 लाख रुपये आणि परमेश्वर राठौर यांच्याकडून 3 लाख रुपये घेतले गेले. त्यांचे प्रशिक्षण सुरु झाले.

असा उघड झाला प्रकार

मनोज अग्रवाल या व्यक्तीने किस्योस्क शाखा उघडण्यासाठी बँकेत पोहचला. त्याने अर्ज भरला. त्याला बँकेच्या शाखेसंदर्भात संशय आहे. त्याने तपास सुरु केला असता ही शाखा बनावट असल्याचे उघड स्पष्ट झाले. त्याने ही माहिती बँकेचे डभरा येथील व्यवस्थापकांना दिली. त्यांनी बँकेत छापा टाकला. त्यावेळी ही बनावट शाखा असल्याचे स्पष्ट झाले. त्या ठिकाणावरुन बँक व्यवस्थापक फरार झाला. त्या बनावट बँकेतील संगणक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

सक्ती येथील एसडीओपी मनीष कुमार ध्रुव यांनी सांगितले की, घटनास्थळी रायपूर क्षेत्र व्यवस्थापकाचे बनावट सील आणि कागदपत्रे सापडली आहेत. पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.