100 छापे, 102 दिवस पाठलाग, वेशांतर, रुमला लॉक लावून वास्तव्य, बाळे बोठेच्या अटेकमागील थरार
पत्रकार बाळ बोठे मागील तीन महिन्यांपसापून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला आज तब्बल 102 दिवसांनंतर अटक करण्यात आलीये. (rekha jare murder case journalist bala bothe arrested)
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे (Rekha Jare) यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या हत्याकांडातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे (Bala Bothe) मागील तीन महिन्यांपसापून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला आज तब्बल 102 दिवसांनंतर अटक करण्यात आलीये. पोलिसांनी त्याला हैदराबाद येथून अटक केलीये. बाळा बोठे याला अटक केल्यानंतर आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. बाळ बोठेने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नामी युक्त्या वापरल्या. कधी वेशांतर तर कधी रुमला लॉक लावून वास्तव्य करणे अशा अनेक प्रकारचे बाळा बोठेचे कारनामे आता समोर येत आहेत. (Rekha Jare murder case journalist Bala Bothe arrested in hyderabad details information)
बाळ बोठ याला पकडण्यासाठी पाच पथके तैनात
सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी निर्घुणपणे हत्या करण्यात आली. हत्या झाल्यानंतर सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत मारेकऱ्यासह पाच आरोपींना अटक केली. या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याने सुपारी देऊन ही हत्या केल्याची माहिती पुढे आली. हा प्रकार समोर आल्यानंतर एकट्या बाळ बोठेला अटक करण्यासाठी पोलिसांनी तब्बल पाच पथके तैनात केली. या पथकांनी आतापर्यंत शंभर ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात छापे टाकले. मात्र एवढी मोठी शोधमोहीम राबवूनही बाळ बोठे पोलिसांना सापडत नव्हता. पोलीस बाळ बोठेचा तब्बल तीन महिन्यांपासून शोध घेत होते. अखेर बाळ बोठे हा हैदराबादमध्ये असल्याची खबर पोलिसांना लागली. त्यानंतर बाळ बोठेला हैदराबाद येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली.
बोठे वेशांतर करुन हॉटलमध्ये राहायचा
बोठे याला अटक करण्यासाठी पोलिसांनी मोठी शोधमोहीमर राबवावी लागली. ऑपरेशनमध्ये हैदराबाद, सोलापूर, मुंबई क्राईम ब्रांच, मुंबई सायबरच्या पथकांचा समावेश होता. जरे यांच्याकडून आपली बदनामी होईल या भीतीने बोठे याने खून केल्याचे तपासात समोर आले आहे. शेवटच्या पाच तासांमध्ये एखाद्या थरारक चित्रपटासारखा घटनाक्रम घडत होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. मनोज पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे बोठे हा वेषांतर करून एका हॉटेलमध्ये राहात होता. शेवटच्या काही तासांमध्ये त्याने वास्तव्याच्या जागा बदलल्या होत्या. त्यातच ज्या हॉटेलमध्ये राहायला होता त्या खोली क्रमांक 109 चा दरवाजा बाहेरून कुलूप लावून बंद केला होता. परंतु पथकाने शिताफीने तपास करत बोठे याला गाठले आणि ताब्यात घेतले.
एकूण 11 जणांना अटक, 102 दिवस सर्च ऑपरेशन
रेखा जरे हत्याकांड प्रकरणात बाळ बोठेचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला होता. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. यावेळी लपून बसण्यासाठी त्याला अनेक जणांकडून मदत होत होती. त्यापैकी शोधमोहिमेदरम्यान पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यानंतर बाळ बोठे याचा सुगावा लागल्यानंतर पोलीस हैदराबद येथे पोहोचले. विषेष म्हणेज बाळ बोठे ज्या रुममध्ये राहायचा त्या रुमला बाहेरुन लॉक लावलेले होते. कोणालाही शंका होऊ नये म्हणून त्याने हा प्रकार केला होता. मात्र तरीदेखील पोलिसांनी बाळ बोठेला जेरबंद केलं. या आटकेसाठी पोलिसांनी 5 दिवस विशेष ऑपरेशन राबवले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. तब्बल 102 दिवसानंतर पोलिसांनी बाळ बोठेला अटक केलीये.
दरम्यान, बोठे याला अटक केल्यानंतर अनेकांनी पोलिसांचे कौतुक केलेय. पोलिसांनी केलेल्या तपासातून प्रथमदर्शनी जरे यांच्याकडून आपली बदनामी होईल या भीतीने बोठे याने त्यांचा खून केल्याचे समोर आले असले तरी पोलीस जरे यांच्या हत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. बाळ बोठे याला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात हे लवकर कळेल.
रेखा जरे हत्याकांड घटनाक्रम
>>> 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ रेखा जरे यांची निर्घृण हत्या
>>> अवघ्या 18 तासात फिरोज शेख, द्यानेश्वर शिंदे आणि आदित्य चोळके यांना अटक
>>> त्यानंतर 24 तासात सर्व 5 आरोपींना अटक केले.
>>> त्यानंतर बाळ बोठे यांनी सुपारी दिल्याची कबुली आरोपींनी दिली
>>> बाळ बोठे यांना अटक करण्यासाठी 5 पोलिसांची पथके तैनात करण्यात आली
>>> नाशिक, पुणे, सोलापूर आशा विविध जिल्ह्यासह अनेक राज्यात पोलीसांनी छापे टाकले मात्र बाळ बोठेला पकडण्यात अपयश
>>> 8 डिसेंबर रोजी बाळ बोठे यांच्या जामिनासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल
>>> 16 डिसेंबर रोजी बाळासाहेब बोठे यांचा अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात जमीन अर्ज फेटाळला
>>> त्यांनतर औरंगाबाद उच्च न्यायालयाने देखील जमीन अर्ज फेटाळला
>>> 26 फेब्रुवारी रोजी 5 आरोपींविरोधात दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आले
>>> अखेर 102 दिवसांनंतर बाळ बोठे याला हैदराबाद येथील एका हॉटेलमधून घेतले ताब्यात
>>> त्यासोबत त्याला मदत करणाऱ्या 5 जणांनादेखील केले अटक
>>> रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांच्यासह 11 आरोपी अटक
इतर बातम्या :
(Rekha Jare murder case journalist Bala Bothe arrested in hyderabad details information)