ऑनलाइन मैत्री, लग्नाचं वचन, अश्लील व्हिडिओ… निवृत्त कर्नलच लागला धंद्याला, काय काय घडलं?
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय सैन्यातील माजी अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर एक मोठा घोटाळा समोर आला आहे. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

एका निवृत्त कर्नलने फसवणूक आणि लुटल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत, माजी लष्करी कर्नलने आरोप केला आहे की त्यांना ओलिस ठेवण्यात आले, मारहाण केली, लुटले आणि बंदुकीचा धाक दाखवून अश्लील व्हिडिओ बनवण्यास भाग पाडले. तक्रारीमध्ये म्हटले गेले आहे की, आरोपी महिला त्यांना मॅट्रिमोनिअल साइटवर भेटली आणि त्यांच्याशी लग्न करण्यास तयार झाली. मात्र, महिलेने भेटायला बोलावल्यानंतर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ही फसवणूक करण्यासाठी तिने प्लान आखला होता, त्यामध्ये तिच्यासोबत आणखी काही लोकांचा समावेश असल्याचे तिने म्हटले.
जानेवारी महिन्यात सुरु झाले होते बोलणे
बरसाना स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) राज कमल सिंग यांच्या मते, गुरुग्रामचे रहिवासी कर्नल रजनीश सोनी (निवृत्त) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी बरसाना येथील एका महिलेने जानेवारीमध्ये विवाहविषयक वेबसाइटवर त्याच्याशी संपर्क साधला होता. महिलेने त्यांच्याशी लग्न करण्यास सहमती दर्शवली आणि ते बोलू लागले. महिलेने कर्नलला २५ जानेवारीला बरसाना येथे येऊन राधारानी मंदिरात भेटण्यास सांगितले होता. ते तेथे पोहोचल्यावर गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर आजूबाजूचा परिसर फिरवण्यासाठी आणि मंदिराला भेट देण्यासाठी घेऊन गेली.
वाचा: बायकोला मामा आवडतो, झेंगाट सुरू.. मोबाईलमध्ये पुरावे, चार पानी चिठ्ठी आणि तरुणाने अखेर…
मारहाण करून पैसे हडपले
गेस्ट हाऊसमध्ये परतल्यानंतर, महिला आणि तिच्या साथीदारांनी कर्नलला सांगितले की तिच्या भावाचा अपघात झाला आहे आणि त्यांना त्वरित जावे लागेल. त्यानंतर ते त्याला तेथे उभ्या असलेल्या कारजवळ घेऊन गेले. कर्नलने आरोप केला आहे की तो शहराच्या हद्दीतून बाहेर पडताच कारमधील लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी त्याचा फोन जप्त केला, त्याला मारहाण केली आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी नातेवाईक आणि मित्रांशी संपर्क साधण्यास भाग पाडले असे एसएचओने सांगितले.
ब्लॅकमेल करत अश्लील व्हिडीओ बनवले
त्यानंतर कर्नलला गेस्ट हाऊसमध्ये परत घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून अश्लील व्हिडीओ आणि छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. त्याने या घटनेची तक्रार केल्यास व्हिडीओ सार्वजनिक केले जातील अशी धमकी देखील त्याला देण्यात आली होती. गेस्ट हाऊसमधून त्यांची पर्स, बॅग, सोन्याची चेन, डेबिट कार्ड आणि रोख 12 हजार रुपये चोरीला गेल्याचा आरोप कर्नलने केला आहे. आरोपींना शोधण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही, असे ते म्हणाले. यानंतर कर्नलने अखेर दोन दिवसांपूर्वी बरसाना पोलिसांना घटनेची माहिती दिली. एसएचओ म्हणाले, “बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सर्व तथ्ये तपासली जात आहेत. तपासात समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.”