आईचा ओरडण्याचा राग, अल्पवयीन मुलीने घर सोडलं, एका रिक्षाचालकाचा आसरा देण्याचा बहाणा, सहा जणांकडून सामूहिक बलात्कार
देश खूप प्रगती करत असला तरी देशातील महिला आणि मुली आजही हव्या तितक्या सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे (Riksha driver and his five friend gang rape on minor girl in lucknow).
लखनऊ : देश खूप प्रगती करत असला तरी देशातील महिला आणि मुली आजही हव्या तितक्या सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊच्या ग्रामीण भागात एक मन हेलावून टाकणारी आणि संतापजनक घटना घडली आहे. एका 14 वर्षीय मुलीवर सहा नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेश हादरलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत (Riksha driver and his five friend gang rape on minor girl in lucknow).
नेमकं प्रकरण काय?
लखनऊच्या ग्रामीण भागातील इटौंजा भागात संबंधित घटना घडली आहे. आईने ओरडलं म्हणून 14 वर्षीय मुलगी घराबाहेर पडली. तिने घरी परत येणार नाही, अशी आई-वडिलांना धमकी दिली. ती घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर तिच्या वडिलांनी इटौंजा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार केली. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना दुसरीकडे मुलगीदेखील मोठ्या संकटात सापडली होती (Riksha driver and his five friend gang rape on minor girl in lucknow).
मुलगी घराबाहेर पडली
मुलगी रागारागात घराबाहेर पडली होती. तेव्हा ती प्रचंड चिंतेत आणि रागात होती. रत्याने चालता-चालता तिला भूक लागली. त्यानंतर ती आणखी चिंतेत पडली. रस्त्याने चालताना एक ई-रिक्शा चालक तिला भेटला. त्याने तिची भल्या माणसासारखी विचारपूस केली. तसेच आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. आपल्या घरी तिची चांगली व्यवस्था करु आणि तिला जेवणही देऊ, असं त्याने पीडितेला सांगितलं. या रिक्शाचालकाचं नाव इकरामुद्दीन असं आहे.
पीडितेवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार
इकरामुद्दीन याच्या अग्रहाखातर मुलगी त्याच्या घरी जाण्यास तयार झाली. मात्र, त्याच्या घरी गेल्यानंतर घडलं ते भलतंच. इकरामुद्दीन याने मुलीला घरी नेल्यानंतर त्याच्या पाच मित्रांना फोन करुन घरी बोलावलं. त्यानंतर सगळ्यांना एकामागे एक असं सहा जणांनी मिळून पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपीने जेवण घेऊन येण्याच्या बहाण्याने मित्रांना फोन केला. त्यानंतर किळसवाणं कृत्य केलं. आरोपीने पीडितेला जेवण तर सोडाच पाणी देखील दिलं नाही. याऊलट तिचा छळ केला.
पोलिसांकडून आरोपींना बेड्या
अखेर या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी इकरामुद्दीन याच्यासह त्याचे मित्र शकील, उत्तम शर्मा, मोहम्मद नफीस, नूर मोहम्मद आणि रितेश यादव यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्या विरोधात कलम 363, 342, 376 D, पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणाचा पुढील तपास उत्तर प्रदेश पोलीस करत आहेत.
हेही वाचा : तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, स्क्रीनशॉट व्हायरल, नागपुरात अल्पवयीन शेजाऱ्याचा प्रताप