Nashik| प्रसिद्ध शिल्पकार गर्गे यांच्या स्टुडिओवर दरोडा; 1400 किलो ब्राँझ धातूची लूट, सुरक्षारक्षक जखमी

उद्योगनगरी, पर्यटननगरी नाशिकची प्रचंड वेगाने क्राईमनगरीकडे सुरू असलेली वाटचाल कधी थांबणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

Nashik| प्रसिद्ध शिल्पकार गर्गे यांच्या स्टुडिओवर दरोडा; 1400 किलो ब्राँझ धातूची लूट, सुरक्षारक्षक जखमी
हरियाणातील पलवलमध्ये तीन मित्रांकडून मुस्लिम तरुणाची मारहाण करुन हत्या
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 10:26 AM

नाशिकः नाशिकची अतिशय भयंकर वेगाने क्राईमनगरीकडे वाटचाल सुरू आहे. पोलिसांनी वेळीच पावले उचलली नाहीत, तर येणारा भविष्यकाळ गंभीर असेल याचाच इशारा प्रसिद्ध शिल्पकार मंदार गर्गे यांच्या स्टुडिओवर पडलेल्या दरोड्याने दिला आहे. दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवून महापुरुषांच्या पुतळ्यातील तब्बल 1400 किलोच्या ब्राँझ धातूची लूट केली आहे. साडेआठ लाखांचा हा ऐवज असल्याचे समजते. या घटनेने नाशिक पुन्हा एकदा हादरले आहे.

अशी घडली घटना?

प्रसिद्ध शिल्पकार मंदार गर्गे यांचा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेळगाव ढगा शिवारात गर्गे आर्ट स्टुडिओ आहे. येथे जवळपास 8 जणांच्या टोळीने दरोडा टाकला. त्यांनी सुरक्षारक्षक जयदेव जाधव यांना कोयत्याचा धाक दाखवला. ते नमले नाहीत तेव्हा त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यांच्या डाव्या दंडावर आणि हातावर कोयत्याने मारहाण केली. शिवाय सुरक्षारक्षक जाधव यांच्या पत्नी शीलाबाई जाधव यांनाही कोयत्याचा धाक दाखवला. अशी दहशत निर्माण करून जाधव यांच्याकडून स्टुडिओच्या चाव्या घेतल्या आणि ब्राँझ धातूची चोरी केली.

महापुरुषांचे पुतळे लक्ष्य

मंदार गर्गे हे ब्राँझ धातूपासून पुतळे बनवतात. त्यांच्या स्टुडिओतून चोरट्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याचे साडेतीनशे किलो वजनाचे दोन भाग, 90 रुपये किमतीची दीडशे किलो वजनाची संत तुकाराम महाराज यांची धातूची वीणा, छत्रपती शिवाजी महारांज्या यांच्या पुतळ्याचा कमरेखाली 2 लाख 70 हजार रुपये किमतीचा भाग, शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची 60 रुपये किमतीची तलवार असा एकूण साधारणतः साडेआठ लाखांचा ब्राँझ धातूचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी सुरक्षारक्षक जयदेव जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे कधी थांबणार?

नाशिकची प्रचंड वेगाने क्राईमनगरीकडे सुरू असलेली वाटचाल कधी थांबणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत. काही दिवसांपूर्वी एकाच आठवड्यात झालेले तीन खून, त्यापूर्वी घडलेल्या दरोड्याच्या घटना आणि त्यानंतर आता काल चक्क शिल्पकारांच्या स्टुडिओवर पडलेला दरोडा. हे सर्व सुरू असताना शहराचे पोलीस आयुक्त फक्त हेल्मेटसक्ती हा एकच मुद्दा रेटून धरत आहेत. त्यांनी या घटनांकडेही लक्ष द्यावे. उद्योगनगरीतील गुन्हेगारांचा हैदोस थांबवावा, अशी मागणी होत आहे.

इतर बातम्याः

Nashik | नोकरीची सुवर्ण संधी, 25 हजार रिक्तपदे भरणार; महारोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन, असे व्हा सहभागी…

Earth Water Research | पृथ्वीवरील पाणी बर्फाळ धूमकेतू आणि अवकाशातील धुलिकणांतून? ब्रिटिश संशोधकांचा दावा

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या टिप्स फाॅलो करा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.