Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Royal Enfield Fire : तुमच्याकडे बुलेट असेल तर तुम्ही ही बातमी बघाच! आधी इंजिनमधून धूर आणि मग जाळ

राजेश गुप्ता समता नगरमध्ये राहायला आहेत. शनिवारी दुपारी राजेश गुप्ता हे यांच्या बुलेट मोटरसायकलवर बसले होते.

Royal Enfield Fire : तुमच्याकडे बुलेट असेल तर तुम्ही ही बातमी बघाच! आधी इंजिनमधून धूर आणि मग जाळ
अचानक पेटली बुलेटImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 8:17 AM

उल्हासनगर : एकीकडे इलेक्ट्रीक दुचाक्यांना (Ola Electric Bike) आग लागण्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. त्यामुळे लोक धास्तावले आहेत. पण फक्त इलेक्ट्रीक कारच नव्हे, तर कार आणि दुचाक्यांनाही कोणत्याही क्षणी आग लागू शकते. उल्हासनगरमधील (Ulhasnagar) घटनेनं ही बाब अधोरेखित केली आहे. रॉयल इनफिल्डवरुन (Royal Enfield) जाणारा एक दुचाकीस्वार त्याच्या बुलेटला आग लागल्यामुळे चांगला घाबरलाय. इतका की त्यानं बाईकच जागच्या जागी सोडून दिली आणि पळ काढला. आधी या बाईकमधून धूर येत असल्याचं दिसून आलं. धूर येताना दिसतोय म्हणून एक इसम या माणसाला सांगायला आला. इंजिनमधून धूर येत असल्याची पुसटशीही कल्पना या बुलेटस्वार व्यक्तीला नव्हती. धूर येत असल्याचं कळताच, या बुलेटस्वारानं बाईकच जागच्या जागी सोडून दिली. त्यानंतर बघता बघता बुलेटनं पेट घेतला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

काय दिसलं सीसीटीव्हीमध्ये?

उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील समता नगरमध्ये हा प्रकार घडला. शेजारीच लागलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकीला आग लागण्याचा थराराक प्रकार कैद झाला. राजेश गुप्ता समता नगरमध्ये राहायला आहेत. शनिवारी दुपारी राजेश गुप्ता हे यांच्या बुलेट मोटरसायकलवर बसले होते. अचानक बुलेटमधून धूर येऊ लागला. त्यामुळे गुप्ता यांनी गाडी तशीच सोडली आणि बाजूला झाले.

वेळीच बुलेटवरुन उतरल्यामुळे राजेश गुप्ता यांचा जीव थोडक्यात वाचलाय. कारण गाडी सोडताच बुलेटमधून त्यानंतर काही क्षणातच त्यांच्या गाडीने पेट घेतला. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी पाणी, रेती, माती, फायर एक्सटिंग्विशरच्या साहाय्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटपर्यंत ही आग विझली नाही. त्यामुळे संपूर्ण गाडी जळून खाक झाली. यात राजेश गुप्ता यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. पण सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही.

का लागली आग?

सध्या तापमानात मोठी वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी गाड्या पेट घेण्याच्या घटना समोर आलेल्यात. वाढलेल्या तापमानात अनेकदा गाडी गरम होऊन पेट घेण्याच्या प्रकार नोंदवले गेलेत आहेत. वाढलेल्या पाऱ्यामुळेच दुचाकीला आग लागल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली असावी, अशी शंका घेतील आहे.

पाहा या संपूर्ण घटनेचं थरारक सीसीटीव्ही :

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.