Crime News | खूप सेक्सी आहेस, मैत्री करणार? युट्यूबरसोबत गैरवर्तन, Video बघून खवळले लोक
Crime News | एका रशियन महिला युट्यूबरसोबत भारताच्या राजधानीत गैरवर्तन करण्यात आलं. कोको असं या रशियन महिलेच नाव आह. यूट्यूब वर Koko in India नावाने एक चॅनल आहे. हे ऐकल्यानंतर कोको अस्वस्थ झाली.
नवी दिल्ली : देशात रशियन महिला यूट्यूबरला गैरवर्तनाचा सामना करावा लागलाय. एका युवकाने यूट्यूबर तरुणीसोबत गैरवर्तन केलं. व्हिडिओमध्ये दिसतय. तरुणीला त्या युवकापासून स्वत:ची सुटका करुन घ्यायची होती. पण आरोपीला यूट्यूबरसोबत मैत्री करायची होती. महिला यूट्यूबरने घटनेशी संबंधित व्हिडिओ शेयर केलाय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये संतापाची भावना आहे. लोकांनी या युवकाला चांगलच धारेवर धरलं. गंभीर बाब म्हणजे राजधानी दिल्लीतील लोकप्रिय स्ट्रीट मार्केट सरोजनी नगरमध्ये ही घटना घडली. कोको असं या रशियन महिलेच नाव आह. यूट्यूब वर Koko in India नावाने एक चॅनल आहे. काही दिवसांपूर्वी सरोजनी नगर मार्केटमध्ये ती आपल्या चॅनलवर लाइव्ह होती.
त्याचवेळी एक युवक तिच्यासोबत चालू लागला. रोज मी तुमचे व्हिडिओ पाहतो, असं तो युवक म्हणाला. हे ऐकल्यानंतर कोको आधी खुश झाली. पण लगेचच त्याने गैरवर्तन सुरु केलं. युवक कोकोला म्हणाला की, ‘तू खूप सेक्सी आहेस. माझी मैत्रीण बनशील का?’ हे ऐकल्यानंतर कोको अस्वस्थ झाली. युवकापासून पाठ सोडवण्याचा ती प्रयत्न करते. मी सहज नवीन मित्र बनवत नाही, असं ती हिंदीमध्ये समजावते. पण युवक ऐकायला तयार होत नाही. तिचा पाठलाग तो सुरुच ठेवतो.
View this post on Instagram
‘ठीक है अलविदा’
यूट्यूबर कोकोने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केलाय. इंडियन फ्रेंडसचा कंटाळा आलाय असं युवक या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतो. कोकाला हिंदी चांगलं बोलता येतं. त्यामुळे लगेच तिने त्याचे इरादे ओळखले. व्हिडिओमध्ये दिसतं, युवकाने जसं अभद्र व्यवहार सुरु केला, तस तिने पाठलाग सोडवण्याचा प्रयत्न केला. ‘ठीक है अलविदा’ म्हणून तिने स्ट्रीमिंग बंद केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक संतापले. अशा लोकांमुळे भारताची बदनामी होते, असं युजर्सच मत आहे. लोकांनी युवकाविरोधात कारवाई करण्याची मागणी करताना यूट्यूबरची माफी मागितलीय.