सचिन वाझेने तुरुंगात सुरक्षा रक्षकाला धमकावलं, एनआयएकडून कोर्टात तक्रार दाखल
सचिन वाझेने तुरुंगात सुरक्षा रक्षकाला धमकावलं. एनआयएकडून कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सचिन वाझेनं कोर्टात उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे.
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचाय अँटिलिया बंगल्याबाहेर स्फोटके सापडली होती. या प्रकरणात सचिन वाझे हा मुख्य आरोपी आहे. वाझे सध्या नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. कारागृहात सुरक्षारक्षकासोबत असभ्य वर्तन केले. तसेच धमकी दिल्याचा आरोप वाझेविरोधात तुरुंग प्रशासनानं केलाय. यामुळं वाझे न्यायालयाच्या तडाख्यात सापडला.
सचिन वाझेने तुरुंगात सुरक्षा रक्षकाला धमकावलं. एनआयएकडून कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सचिन वाझेनं कोर्टात उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. डोळे आले असताना मला रुग्णालयात नेले नाही, असा आरोप सचिव वाझे यानं केलाय. वाझेनं तुरुंग प्रशासनावर हा आरोप केलाय.
तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीमुळं अडचणीत वाढ होऊ शकते, हे वाझेच्या लक्षात आले. त्यामुळं त्यानं माफी मागितली होती. आज सुनावणी झाली. यावेळी वाझेनं कोर्टात उत्तर देण्यासाठी वेळ मागवून घेतला. उलट, तुरुंग प्रशासनावरच रुग्णालयात उपचारासाठी नेले नसल्याचा आरोप केला.
दोन्ही डोळ्यांमध्ये ग्लुकोमा झाला आहे. मला रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी द्या, अशी विनंतीही त्यानं न्यायालयात केली होती. तुरुंगात असताना सुरक्षा रक्षकानं अडवताच वाझेनं जोराजोरात ओरडत धमकी दिली. तुरुंग प्रशासनानं सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली होती.