Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Waze: मुंबई पोलीस दलातील ‘त्या’ अधिकाऱ्याकडे केस गेली अन् घाबरलेल्या सचिन वाझेंनी मनसुखला संपवले

सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. | Sachin Waze Mansukh Hiren

Sachin Waze: मुंबई पोलीस दलातील 'त्या' अधिकाऱ्याकडे केस गेली अन् घाबरलेल्या सचिन वाझेंनी मनसुखला संपवले
मनसुख हिरेन आणि सचिन वाझे
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 12:19 PM

मुंबई: मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) हाती नवीन माहिती लागली आहे. त्यामुळे सचिन वाझे (Sachin Waze) यांनी मनसुख हिरेनची हत्या का घडवून आणली, याचा उलगडा झाल्याचे मानले जात आहे. (NIA reveal the mystry why Sachin Waze killed Mansukh Hiren)

‘एनआयए’ने यासंदर्भात नुकताच एका पोलीस कॉन्स्टेबल आणि एका हॉटेल व्यावसायिकाचा जबाब नोंदवून घेतला. हे दोन्ही जबाब आणि मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती याआधारे एनआयएने सगळा गुंता सोडवला आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. मी तुला दोन-तीन दिवसांत जामिनावर बाहेर काढेन, असेही वाझे यांनी म्हटले होते. मनसुखने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली होती. वाझे यांनी वारंवार सांगूनही मनसुख हिरेन तयार नव्हता. आपण ही केस डोक्यावर का घ्यावी, असे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मनसुख हिरेन घरी निघून गेला.

दरम्यानच्या काळात 2 मार्च रोजी हे प्रकरण एसीपी नितीन अलकनुरे यांच्याकडे सोपवण्यात आले. तेव्हा नितीन अलकनुरे स्कॉर्पिओचा मालक म्हणून मनसुख हिरेनला चौकशीसाठी बोलावतील ही बाब स्पष्ट होती. नितीन अलकनुरे यांनी मनसुख हिरेनचा जबाब घेतला तर सर्व गोष्टी समोर येतील, अशी भीती सचिन वाझे यांना वाटली.

त्यामुळेच 4 मार्चला विनायक शिंदे याने बनावट सीम वापरुन मनसुख हिरेनला फोन केला. मी पोलीस अधिकारी तावडे बोलत असल्याचे सांगत त्याने मनसुखला घोडबंदर येथे बोलवून घेतले. त्यानंतर मनसुख हिरेनची हत्या करुन त्याचा मृतदेह खाडीत फेकून देण्यात आला. मनसुख हिरेन याने एसीपी अलकनुरे यांच्यासमोर खरा जबाब नोंदवू नये म्हणूनच सचिन वाझे यांना त्याचा काटा काढावा लागला, हे स्पष्ट झाले आहे.

मनसुख हिरेन हत्याप्रकरणात 35 जणांचे जबाब

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मनसुख हिरेन हत्याप्रकरणात आणखी तीन जणांचे जबाब नोंदवले आहेत. आतापर्यंत याप्रकरणात एकूण 35 जणांनी जबाब नोंदवले आहेत. तसेच 100 कोटी रुपयांच्या वसुलीसंदर्भातही एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून काही पब, बार आणि हॉटेल मालकांचे जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

‘वाझे साहेबच मेन आहेत, काही होणार नाही’; मनसुख हिरेनचे भावासोबतचे फोनवरील संभाषण उघड

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने टेन्शन वाढले, त्यानंतर वाझेंनी काय केलं?; वाचा, सविस्तर

Sachin Waze: सहकारी वाझेंना म्हणायचे ‘टेक कॉप’; तयार केलं होतं स्वत:चं सर्च इंजिन आणि मोबाईल मेसेजिंग अ‍ॅप

(NIA reveal the mystry why Sachin Waze killed Mansukh Hiren)

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.