Breaking : सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनण्यास तयार! अनिल देशमुखांच्या अडचणीत मोठी भर?
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याची माहिती मिळतेय. तसं एक पत्रच सचिन वाझेकडून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीला देण्यात आलं आहे.
मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याची माहिती मिळतेय. तसं एक पत्रच सचिन वाझेकडून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीला (Enforcement Directorate) देण्यात आलं आहे. वाझे यासंदर्भात ईडीकडे 14 फेब्रुवारी रोजी आपलं म्हणणं मांडणार असल्याचंही कळतंय.
Suspended Maharashtra Police officer Sachin Waze (in file photo) writes to Enforcement Directorate (ED), seeking to be declared an approver in the money laundering case against former State Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/kXkZKdWyLy
— ANI (@ANI) February 9, 2022
वाझे, देशमुखांची चांदीवाल आयोगासमोर हजेरी
तत्पूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना आज चांदीवाल आयोगासमोर हजर करण्यात आलं. तर एका प्रतिज्ञापत्रात वाझेने सांगितलं की, त्याने अनिल देशमुख यांच्या निर्देशानुसारच बारमधून खंडणीची वसुली केली. इतकंच नाही तर अनिल देशमुख यांनी आपल्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असंही वाझे याने म्हटल्याचं कळतंय. त्याचबरोबर वाझेनं असंही सांगितलं की, देशमुख यांनी आपल्या आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात जबरदस्ती वसूलीच्या खोट्या केसेस दाखल केल्या.
Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh & suspended police officer Sachin Waze today appeared before Chandiwal Commission today. In an affidavit, Waze said he extorted money from bars on Deshmukh’s instructions.
(File photo) pic.twitter.com/sM9mrlxqk0
— ANI (@ANI) February 9, 2022
परमबीर सिंहांच्या आरोपानंतर प्रकरण उजेडात
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दावा केला होता की अनिल देशमुख यांनी वाझेला बार आणि हुक्का पार्लरमधून महिन्याला 100 कोटीच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. सिंह यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाचा तपास करण्यासाठी जस्टिस के. यू. चांदीवाल कमिटीची स्थापना केली होती.
इतर बातम्या :