हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बैठक, वाझेंचीही हजेरी; एनआयएचा कोर्टात दावा
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्याच्या आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा एनआयएकडून तपास केला जात आहे. (Sachin Waze was present at meeting where Hiren’s murder was planned, NIA says)
मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्याच्या आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा एनआयएकडून तपास केला जात आहे. या प्रकरणी एनआयएने निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटकही केली आहे. याप्रकरणात एनआयएने विशेष न्यायालयात धक्कादायक माहिती दिली. मनसुख हिरेनची हत्या करण्याचा कट ज्या बैठकीत रचला गेला त्या बैठकीला सचिन वाझेही उपस्थित होते, असा दावा एनआयएने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Sachin Waze was present at meeting where Hiren’s murder was planned, NIA says)
मनसुख हिरेन प्रकरणात एनआयएने विशेष न्यायालयाला मंगळवारी मोठी माहिती दिली. जेव्हा मनसुख हिरेनची हत्या करण्याचा कट शिजत होता, तेव्हा त्या बैठकीला वाझेही उपस्थित होते. वाझेंसोबत निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदेही या बैठकीला उपस्थित होता. हत्येतील आरोपींना संपर्क करण्यासाठी वाझेने एका मोबाईलचा वापर केला होता, असंही एनआयएने कोर्टाला सांगितलं आहे.
7 एप्रिलपर्यंत कोठडी
दरम्यान, एनआयएने हिरेन हत्येचा कट रचणाऱ्याचं नाव उघड केलं नाही. हिरेन हत्येचा छडा लावण्यात एनआयएला मोठं यश मिळालं असल्याचं एनआयएच्या वकिलाने कोर्टाला सांगितलं. यानंतर न्यायाधीश पीआर सित्रे यांनी विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोर यांना 7 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली.
हत्येचा हेतू काय?
हिरेन यांच्या हत्येचा हेतू काय होता? याबाबतही एनआयएने कोर्टाला माहिती दिली आहे. हिरेन यांच्या हत्येचा हेतू काय होता हे जाणून घेण्यात आम्ही बऱ्यापैकी यश मिळवलं आहे, असं एनआयएने कोर्टाला सांगितलं आहे. दरम्यान, विनायक शिंदे याचे वकील गौतम जैन यांनी या हत्येत आणि षडयंत्रात शिंदे याचा हात नसल्याचं कोर्टाला सांगितलं. सीम कार्ड देण्याच्या पलिकडे कोणत्याही आरोपीला अन्य आरोपात जबाबदार धरण्यात आलं नाही. शिंदे गेल्या नऊ दिवसांपासून एनआयएच्या कस्टडीत आहे. त्यामुळे त्याची कस्टडी वाढवण्याची गरज नाही, असं जैन यांनी कोर्टाला सांगितलं.
आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद धुडकावला
दरम्यान, कोर्टाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद धुडकावून लावला. नरेश गोर याचे वकील आफताब डायमंडवाला यांनी या प्रकरणात केवल सीम कार्ड देण्याइतपतच गोर याचा संबंध आहे. त्यामुळे गोर याला विनाकारण कोठडीत ठेवण्यात आलं आहे, असं सांगितलं. कोर्टाने मात्र हा युक्तिवाद फेटाळून लावत शिंदे आणि गोर यांना 7 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली. (Sachin Waze was present at meeting where Hiren’s murder was planned, NIA says)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 31 March 2021https://t.co/agiDudJrt8
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2021
संबंधित बातम्या:
हिरेनप्रकरणी आणखी एकाला अहमदाबादवरून अटक; एनआयए घेणार ताब्यात
‘वाझे साहेबच मेन आहेत, काही होणार नाही’; मनसुख हिरेनचे भावासोबतचे फोनवरील संभाषण उघड
(Sachin Waze was present at meeting where Hiren’s murder was planned, NIA says)