Terror threat | ‘इंशाअल्लाह लवकरच दुसर पुलवामा…’ देवबंदच्या मदरशातील विद्यार्थ्याची धमकी
Terror threat | पोलिसांनी मदरशातील विद्यार्थ्याला ताब्यात घेतलय. 2019 मध्ये काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. आत्मघातकी दहशतवाद्याने आपली कार जवानांच्या बसला धडकवली होती. त्यात CRPF चे 40 पेक्षा जवान शहीद झाले होते.
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या देवबंदमधून पोलिसांनी मदरशातील एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर आपत्तीजनक पोस्ट केल्याचा आरोप आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिलय की, ‘इंशाअल्लाह लवकरच दुसर पुलवामा होईल’ या पोस्टने पोलीस खात्यात एकच खळबळ उडवून दिली. पोलिसांनी तातडीने पावल उचलली. त्यांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवत त्याला ताब्यात घेतलं. ATS कडून सुद्धा आरोपीची चौकशी सुरु आहे. या पोस्टनंतर गुप्तचर यंत्रणा सुद्धा अलर्ट झाल्या आहेत. नववर्षाच्या आधी ही धमकीची पोस्ट केलीय. त्यामुळे पोलीस सुद्धा गंभीर आहेत. ताब्यात घेतलेला आरोपी झारखंडचा राहणारा आहे. सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथील मदरशात तालीम शिकण्यासाठी तो आला आहे.
मोहम्मद ताल्हा मजहर देवबंदच्या एका मदरशामध्ये राहून शिक्षण घेत आहे. तो झारखंडच्या जमशेदपुर सरायकेला येथे राहतो. ताल्हावर ‘X’ वर धमकीची पोस्ट केल्याचा आरोप आहे. पोस्टमध्ये त्याने पुलवामासारखा दुसरा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या पोस्टवरुन सहारनपूर पोलिसांनी आरोपी विद्यार्थी ताल्हाला ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात देवबंदमधील खानखाह चौकीत गुन्हा नोंदवण्यात आलाय. आरोपी विद्यार्थ्याची पोलीस आणि ATS कडून चौकशी सुरु आहे.
चौकशीसाठी स्पेशल टीम
आरोपी विद्यार्थी ताल्हाने ‘X’ वर लिहिल होतं की, लवकरच इंशाअल्लाह दुसर पुलवामा होईल. या पोस्टनंतर स्थानिक पोलीस, लोकल एटीएस आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. आरोपी विद्यार्थ्याच्या व्हॉट्सएप ग्रुप, यूट्यूब, गुगलसह अन्य सोशल मीडिया अकाऊंटसची चौकशी सुरु आहे. आपत्तिजनक पोस्ट करणाऱ्या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याची चौकशी सुरु आहे असं सहारनपूरचे एसएसपी डॉ. विपिन ताडा यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक टीम बनवण्यात आलीय.