Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला विरोध, आंबेडकरी चळवळीतील 25 पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून चुकीची कारवाई म्हणत आंदोलक आक्रमक
चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीम सैनिकांनी केली आहे
पुणे : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील (Ambedkari movement) पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्यांच्याविरुध्द पोलिस स्टेशनमध्ये (Daund Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चुकीच्या पद्धतीने कारवाई करीत असल्याचे म्हणत भीम सैनिक आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी आंबेडकरी चळवळीतील 25 पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने कारवाई करीत असल्याचे म्हणत भीम सैनिकांनी पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करावी असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे ?
शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला दौंड मधील भीम सैनिकांनी विरोध दर्शविला. त्यानंतर दौंड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 25 भीम सैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे दौंड मधील कार्यक्रमाला भिडे गुरुजी उपस्थित न राहता पुढच्या नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले होते. त्यावेळी संभाजी भिडे समर्थक आणि भीम सैनिक यांनी दौंड शहरात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यानंतर दौंड पोलिस स्टेशनमध्ये भीम सैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने भीम सैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीम सैनिकांनी केली आहे अशी माहिती अश्विन वाघमारे यांनी सांगितली.