Sameer Wankhede : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंची चौकशी, 23 तासांच्या चौकशीत काय मिळाल?
एनसीबीने (Ncb) समीर वानखेडे यांचीच तब्बल 23 तास चौकशी केली आहे. त्यामुळे आर्यन खान (Aryan Khan Drug Case) प्रकरणात वानखेडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर आता वानखेडेंचा पाय खोलात घुसणार का? असा सवाल अनेकांना पडला आहे.
मुंबई : माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण एनसीबीने (Ncb) समीर वानखेडे यांचीच तब्बल 23 तास चौकशी केली आहे. त्यामुळे आर्यन खान (Aryan Khan Drug Case) प्रकरणात वानखेडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर आता वानखेडेंचा पाय खोलात घुसणार का? असा सवाल अनेकांना पडला आहे. या कसून झालेल्या चौकशीत एनसीबीच्या हाती काही लागलं किंवा नाही. याची मात्र स्पष्ट महिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. येत्या मार्चमध्ये या चौकशीचा अंतिम अहवाल सादर होणार आहे. देशातल्या हायप्रोफाईल केसेपैकी एक आर्यन खान ड्रग्ज प्रकरण अत्यंत गाजलं. शाहरुख खानच्या मुलाला अटक झाल्याने देशात खळबळ माजाली होती. यानंतर वानखेडे यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले. मात्र ही कारवाई पूर्णपणे कायद्याचे पालन करून करण्यात आल्याचे वानखेडे यांच्याकडून सांगण्यात आलं.
चौकशीत वानखेडेंना काय विचारलं?
वानखेडे यांची आता कसून चौकशी केल्यानंतर काही महत्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे. समीन वानखेडे यांनी या चौकशीदरम्यान काही महत्वाची कागदपत्रे एनसीबीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांना सादर केल्याचेही बोलले जात आहे. या कागदपत्रातून काय बाहेर येतंय हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे. या चौकशीदरम्यान आर्य खानच्या मेडीकलबाबतही समीर वानखेडेंना विचारणा करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. फक्त मेडीकलच नाही तर आर्य खानला जे फोन उपलब्ध करून दिले त्याबाबतही वानखेडेंना स्पष्टीकरण मागितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अहवाल आता काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
वानखेडे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात
या तब्बल तेवीस तास चाललेल्या चौकशीत अनेक गोष्टी समोर येण्याची, अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण गाजल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही वानखेडे यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे हे खोटे जात प्रमाणपत्र देऊन भरती झाले आहेत. असा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. त्यावेळी वानखेडे आणि त्यांच्या परिवारानेही नवाब मलिक यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मात्र हा वाद देशभर गाजला होता. आता वानखेडेंच्या झालेल्या चौकशीनंतर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
एक म्हणतो ‘हा कोंडा रेड्डी’ तर दुसरा म्हणतो ‘हा भाजपात जाणार!’ माणूस साधासुधा नाही, आडनाव आहे गांधी!
Video | कुडाळमध्ये भांडले सेना-भाजप आणि मलाई काँग्रेसला! सेना-भाजपच्या राड्याचं फलित काय?