रात्रीस खेळ चाले, जळगावात वाळू माफियांचा हैदोस, प्रांताधिकार्‍यांचा गळा दाबत हत्येचा प्रयत्न

जळगावात वाळू माफियांनी अक्षरश: हैदोस माजवला आहे. या वाळू माफियांनी आता तर सर्वच सीमा पार केल्या आहेत. या आरोपींनी एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गिरणा नदीपात्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

रात्रीस खेळ चाले, जळगावात वाळू माफियांचा हैदोस, प्रांताधिकार्‍यांचा गळा दाबत हत्येचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 9:21 PM

किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे. माळू माफियांची मुजोरी इतकी वाढली आहे की, आता शासकीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आलीय. एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गिरणा नदीपात्रात कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकार्‍यांना जमिनीवर पाडून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. वाळू माफियांनी पथकावर दगडफेकही केली. याप्रकरणी कासोदा येथील पोलीस ठाण्यात मुख्य संशयितासह 10-12 अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाण्यापासून अवघ्या 17 किलोमीटरवरील उत्राण येथील गिरणा नदीपात्रात संपूर्ण घटना घडली. नदीपात्रात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी, भालगावचे मंडळ अधिकारी दीपक ठोंबरे, तलाठी शेख शकील, निपाणीचे तलाठी विश्‍वंभर शिरसाठ, पोलीसपाटील प्रदीप तिवारी, महाजन आदींचे पथक उतरले होते. तिथे 8 ते 10 ट्रॅक्टर वाळू भरत असल्याचे दिसून आले. पथकाला पाहताच चालकांनी ट्रॅक्टर भरधाव घेत पलायन केले.

आरोपींचा अधिकाऱ्यांवर हल्ला

मात्र, तिथे दोन ट्रॅक्टर थांबले होते. पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळताच तिथे आणखी चार-पाच जण आले. त्यांना उपविभागीय अधिकारी गायकवाड, मंडळ अधिकारी गायधनी यांनी सरकारी कामात अडथळा आणू नका, असे बजावत आमचे काम करू द्या, असे सांगितले. पण ट्रॅक्टरचालक आकाश राजेंद्र पाटील, अमोल, राहुल, दादाभाऊ, सागर यांच्यासह 10-12 अज्ञात मारेकर्‍यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी पथकातील अधिकार्‍यांना पकडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी उपविभागीय अधिकारी गायकवाड यांना जमिनीवर पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

गायकवाड यांची प्रमोद गायधनी, दीपक ठोंबरे यांच्यासह कर्मचार्‍यांनी कसेबसे वाळू माफियांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर संशयितांनी दगडफेक केल्याने गायकवाड, गायधनी, ठोंबरे यांच्यासह कर्मचारी जखमी झाले. दगडफेकीत गायकवाड यांचा डोळा थोडक्यात बचावला. या झटापटीत गायधनी यांच्या हाताला, कंबरेवर मुका मार लागला आहे. त्यांच्यावर एरंडोल येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. उत्राणचे मंडळ अधिकारी गायधनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा येथील पोलीस ठाण्यात मुख्य संशयित आकाश पाटील याच्यासह 10-12 अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“आमच्या अंगावर बसून मारेकर्‍यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आम्हीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मारेकर्‍यांचे संख्याबळ अधिक असल्यामुळे आम्ही तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी केलेल्या दगडफेकीत आम्ही सर्व जखमी झालो. एरंडोल येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना घटनेची माहिती देत, पथकांना हत्यारे देण्याची मागणी केली आहे”, अशी प्रतिक्रिया जखमी मंडळ अधिकारी प्रमोद गायधनी यांनी दिली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक तथा कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांनी भेट देत जखमी अधिकार्‍यांची विचारपूस केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.